Mukesh Khanna On Jana Gana Mana Controversy : मुकेश खन्ना यांनी ‘जन गण मन’च्या वादावर पुन्हा एकदा केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुकेश खन्ना सामाजिक विषयांवर निर्भीडपणे बोलतात आणि आपली मतं उघडपणे मांडतात. सध्या ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करण्याची चर्चा सुरू आहे. या वादावर मुकेश खन्ना यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. ‘जन गण मन’ हे ब्रिटिश राजवटीत जॉर्ज पंचम यांच्या स्तुतीसाठी लिहिले गेलं होतं, त्यामुळे ते राष्ट्रगीत मानलं जाऊ शकत नाही, असा दावा मुकेश खन्ना यांनी केला आहे.
काय म्हणाले मुकेश खन्ना?
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मुकेश खन्ना म्हणाले की, ”वंदे मातरम्’बद्दल इतका वाद निर्माण झाला आहे की त्याला अवाजवी महत्त्व दिलं गेलं आहे. माझं वक्तव्य व्हायरल केलं गेलंय. मी फक्त मध्येच असं काहीतरी म्हटलं होतं की, ‘जन गण मन’ माझ्या देशाचं राष्ट्रगीत असू शकत नाही. हे जॉर्ज पंचम यांच्या कारकिर्दीत किंवा ब्रिटिश साम्राज्याच्या काळात गायलं जायचं. आपण गुलाम होतो. त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ हे गाणं लिहिलं गेलं आहे.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
”अधिनायक’ म्हणजे काय? अधिनायक जय हे… भारत भाग्य विधाता म्हणजे तुम्ही आमच्या नशिबाचे निर्माते आहात. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, ते सर्व तुमची स्तुती करतात. जर हिंदी समजणाऱ्या कोणी यावर विचार केला, जर हा ध्वजाबद्दलचा विषय असेल. पण, भारत माता आणि राष्ट्रध्वज हे नशिबाचे निर्माते नाहीत. आम्ही त्यांना आमची प्रतीकं मानतो.’ असंही मुकेश यांनी पुढे म्हटलं.
‘वंदे मातरम्’बद्दल मुकेश खन्ना पुढे म्हणाले, “वंदे मातरम्’मध्ये आपण वाकून म्हणतो की, हे भारत माता, आम्ही तुला वंदन करतो. ‘जन गण मन अधिनायक’चा विषय सोडून द्या, ‘वंदे मातरम्’बद्दल मला वाटतं की, हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत असलं पाहिजे. इतकी वर्षे आपण इंग्रजांचा जाच सहन केला आहे. इंग्रज गेले, पण इंग्रजी सोडून गेले. आजही आपण इंग्रजीत शिकणं हेच आपलं महत्त्व समजतो. मोठमोठे लोक आपल्या मुलांना ऑक्सफर्डला पाठवतात. इथे नालंदा विद्यापीठ होतं. वेद आहेत, पुराणं आहेत, गुरुकुल आहे.’
Mugdha Shah : सावत्र आईकडून छळ, मैत्रीण ठरली देवदूत, मृत्यूच्या दाढेतून परतली मराठी अभिनेत्री; सांगितला कठीण काळ केंद्र सरकारनं भारताचे राष्ट्रगीत, ‘जन गण मन’ आणि राष्ट्रगीत, ‘वंदे मातरम्’ यांसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. कोणत्या कार्यक्रमांमध्ये दोन्ही गाणी गायली किंवा वाजवली पाहिजेत, हे स्पष्ट करणाऱ्या सूचना सरकारनं जारी केल्या आहेत. मंत्रालयानं म्हटलं आहे की, एकाच कार्यक्रमात, प्रथम ‘वंदे मातरम्’ लावलं जाईल आणि त्यानंतर ‘जन गण मन’ लावलं जाईल. ज्या राज्यांचं स्वतःचं राज्यगीत आहे, त्यांनाही हाच क्रम पाळावा लागेल.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा