Headlines

msrtc suspends 12 officers major action nashik amravati; एसटी महामंडळाकडून एका झटक्यात थेट 12 अधिकारी निलंबित, कोणत्या विभागांत कारवाई?


MSRTC News : एसटी महामंडळाने प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारत अमरावती आणि नाशिक विभागातील १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष समितीच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते.

msrtc suspends 12 officers major action nashik amravati
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. कामातील हलगर्जीपणा, नियमभंग आणि कर्तव्यातील कसूर याप्रकरणी अमरावती आणि नाशिक विभागातील एकूण १२ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नाशिक विभागात एकाच वेळी ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने एसटी प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांच्यावर कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचा आणि कामात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रादेशिक व्यवस्थापकांनी त्यांना तत्काळ निलंबित केले असून विभागीय चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास त्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्याची कारवाई होऊ शकते.

नाशिक विभागातही मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कामकाजातील त्रुटी आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून तब्बल ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यामध्ये तीन वर्ग-१ आणि आठ वर्ग-२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दोन आगार व्यवस्थापकांसह नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

विशेष समितीच्या अहवालानंतर कारवाई

एसटीचे उत्पन्न वाढवणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवणे या उद्देशाने मुख्यालयाने विशेष नियंत्रण समितीची स्थापना केली होती. १० जून रोजी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी यांच्या दोन सदस्यीय समितीने नाशिक विभागात अचानक तपासणी केली. या तपासणीत अनेक कार्यालयांतील कामकाजात गंभीर त्रुटी, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय उणिवा आढळून आल्या. समितीने सादर केलेल्या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; BMCच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन, कंत्राटदार ब्लॅकलिस्ट

आदेश स्वीकारले नाही तर पोस्टाने पाठवणार

निलंबनाचे आदेश स्वीकारण्यास कोणत्याही अधिकाऱ्याने नकार दिल्यास ते त्यांच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्यात येतील, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे कारवाई टाळण्याचा कोणताही प्रयत्न चालणार नसल्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत.

एसटी प्रशासनात धास्तीचे वातावरण

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने नाशिक विभागात चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी कामकाजावरही त्याचा परिणाम झाल्याची चर्चा आहे. या धडक कारवाईनंतर एसटीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, कामातील निष्काळजीपणा आणि शिस्तभंग यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश महामंडळाने दिला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा