जळगावच्या जामनेर डेपोतून MSRTC ची नवी बस चोरीला गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टायर पंक्चर झाल्यानंतर चोरट्यांनी बस वाटेतच सोडून दिली. पण या प्रकरणामुळे डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बस कशी झाली चोरी?
हा व्हिडीओ @PophleeGor51025 या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर घडलं असं की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर डेपोतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चोरांनी पळवून नेली. पण सुदैवाने काही अंतरावर गेल्यानंतर बसचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चोरट्यांनी या बसला तिथेच सोडून पळ काढला. कारण बस पुढे नेणं त्यांना शक्य नव्हतं. अर्थात, ही चोरी डेपोमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. पण या प्रकरणामुळे डेपोतील सुरक्षा व्यवस्थेवर मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले
या घटनेनंतर जामनेर डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डेपोतून नवीन बस चोरट्यांनी कशी बाहेर नेली? या चोरीमध्ये तेथील कुणा कर्मचाऱ्याने त्यांना मदत केली होती का? किंवा सुरक्षा प्रणालीत काही त्रुटी होत्या का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसंच, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक कामाला लावलं आहे. असो, पण या व्हायरल व्हिडीओवर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

