Sports Car Birthday Surprise: एका आईच्या हाकेवर चार वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी संपूर्ण शहर त्याच्या घरासमोर गोळा झालं. या घटनेतून माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. अमेरिकेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं?
हा व्हिडिओ sarika_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडली. आईने केलेली ही पोस्ट केवळ सोसायटीच्या ग्रुपपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती शहरभर व्हायरल झाली. संपूर्ण शहरातील लोक आपल्या स्पोर्ट्स कार घेऊन या मुलाच्या घरासमोर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले. या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे फेरारी, लँबॉर्गिनी, मर्सिडीज-बेंझ, पोर्शे, मॅकलारेन, बुगाटी, ॲस्टन मार्टिन, मासेराती, बेंटली, अल्फा रोमिओ, अल्पाइन, फोर्ड मस्टँग अशा एकापेक्षा एक महागड्या आणि आकर्षक कार या घरासमोर उभ्या होत्या. हा प्रकार पाहून मुलगा इतका आनंदी झाला की त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं.
(फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram)
नेटकऱ्यांच्या मनालाही स्पर्श
हा व्हिडिओ ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे, “माणुसकी अजून जिवंत आहे.” तर काहींनी एका अनोळखी मुलाच्या वाढदिवसासाठी जमलेल्या सर्व स्पोर्ट्स कार मालकांना सलाम केला आहे. असो, हा प्रकार पाहून तुमच्या मनात कोणते विचार आले? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

