Mira Road Domestic help killed in Flat TV Actor Ashish Meshram arrested Crime News; चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक
Mira Road Domestic help killed in Flat TV Actor Ashish Meshram arrested Crime News; चार मुलांच्या आईकडे लैंगिक सुखाची मागणी, नकार दिल्याने जीव घेतला, टीव्ही अभिनेता आशिष मेश्रामला अटक
Mira Road Woman Killed : आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याने यापूर्वी मयत महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती, मात्र तिने वारंवार फेटाळून लावल्याच्या वृत्तालाही पोलिसांनी दुजोरा दिला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, पालघर : मिरा रोडच्या सिल्वर पार्क येथील एका इमारतीत बुधवारी रात्री ३७ वर्षीय विवाहितेची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. ही महिला घरकाम करत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये तिची हत्या करण्यात आली. टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याने महिलेचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीला मिरा रोड पोलिसांकडून शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे. लैंगिक सुखाची मागणी धुडकावल्याने आशिषने तिचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
काशिमिरा येथे वास्तव्यास असलेल्या सुमन कांबळे या सिल्वर पार्क येथील ‘चंद्रेश आर्केड’ इमारतीत गेल्या काही महिन्यांपासून घरकाम करत होत्या. बुधवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या होत्या. यावेळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजातच त्या गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेला दिसून आले. त्यांनी इतर नागरिकांना बोलावून, त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच सुमन यांचा मृत्यू झाला होता.
हल्ला झाला, त्यावेळी त्या एकट्याच घरात होत्या. त्यांच्या मान, छाती आणि पोटावर सपासप वार करण्यात आले. मीरा रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत वेगात असल्याचं दिसलं. त्यावरुन हा गुन्हा “एक पूर्वनियोजित कट” असल्याचं दर्शवतं. सध्या ट्रान्झिट रिमांडवर असलेल्या आरोपीला या आठवड्याच्या अखेरीस शहरात आणलं जाईल आणि त्यानंतरच घटनेचा नेमका क्रम स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. Pune News : रामनवमीची मिरवणूक पाहताना पुण्यात महिलेचा करुण अंत, डीजेच्या दणदणाटाने हार्ट अटॅक आल्याचा कुटुंबाचा आरोप
लैंगिक सुखाची मागणी
आरोपीने यापूर्वी मयत महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती, मात्र तिने वारंवार फेटाळून लावल्याच्या वृत्तालाही पोलिसांनी दुजोरा दिला. ज्या फ्लॅटमध्ये ही हत्या झाली, तिथे पूर्वी केवळ आशिषचा मोठा भाऊच राहत असे; परंतु साधारण दीड वर्षांपूर्वी आशिषनेही तिथे राहायला सुरुवात केली.
चार मुलांची आई
सुमन कांबळे यांच्या पश्चात पती आणि चार मुलं असा परिवार आहे. पती चप्पल दुरुस्तीचं काम करतो, तर मोठा मुलगा एका खाजगी कंपनीत काम करतो. सुमन ८-९ घरांमध्ये घरकाम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावत असे. ती गेल्या तीन वर्षांपासून आशिष मेश्रामच्या घरी काम करत होती.
एफआयआरनुसार, जानेवारी महिन्यात आशिषने सुमनच्या दुसऱ्या मुलाला फोन केला होता. सुमनने आपल्याकडे काम करणं बंद केलं किंवा आपल्या लैंगिक मागणीला नकार दिला, तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
अशोक खरातचे पोलिस कोठडीत अजब दावे, SIT चौकशीत काय काय समोर आलं?
याच वेळी, त्या मुलाने आपल्या आईकडे याविषयी विचारणा केली. अखेरीस सुमनने आपल्यावर ओढवलेल्या गंभीर प्रकाराविषयी मोकळेपणाने सांगितलं. आशिष आपल्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत असल्यामुळेच आपण त्याच्या घरी काम करणं बंद केल्याचं सांगितलं.
आशिषला केलेली मारहाण
हे ऐकून तिचा मुलगा संतापाने पेटून उठला. आशिषचा शोध घेत त्याच्या फ्लॅटमध्ये गेला; परंतु त्याला आशिष तिथे आढळला नाही. काही दिवसांनंतर जेव्हा त्या मुलाला आशिष मिरा रोड परिसरात दिसला, तेव्हा त्याने आशिषला बेदम मारहाण केली आणि आपल्या आईपासून दूर राहण्याची त्याला ताकीद दिली. Ashok Kharat : कोंबडीचोरीमुळे बापाने घराबाहेर काढला, नानांनी 50 रुपये टेकवताच पळाला, बारा वर्षांनी हाँगकाँगहून पत्र, खरातचे प्रताप त्यानंतर आशिषच्या मोठ्या भावाने सुमनला आश्वस्त केलं की, आपला भाऊ आता आपल्यासोबत राहत नाही आणि त्यामुळे तिने त्या घरात पुन्हा कामावर रुजू व्हावे. बुधवारी रात्री जेव्हा सुमन कामासाठी त्यांच्या फ्लॅटवर गेली, तेव्हा आशिषने घरात प्रवेश केला आणि तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा