Richest to RAGs: एकेकाळी भारतीय आरोग्यसेवा उद्योगातील चर्चित व्यक्तींपैकी सिंग बंधू – मालविंदर आणि शिविंदर – औषधनिर्माण क्षेत्रातील दिग्गज कंपनी रॅनबॅक्सीचे प्रमोटर होते. पण 2008 मध्ये कंपनीतील हिस्सा विकल्यानंतर कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि कर्जाच्या व ओझ्याखाली दबलेले आणि न्यायालयात खटले हरल्यामुळे सिंग बंधूंच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या बोजा पडला.

रॅनबॅक्सीच्या दिवाळखोरीची कहाणी
एकेकाळी रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज अत्यंत नावाजलेली कंपनी होती. केवळ एक दशकापूर्वी, 2015 मध्ये, रॅनबॅक्सीचे प्रमोटर मालविंदर आणि शिविंदर सिंग अंदाजे 2.5 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत संयुक्त 35 व्या क्रमांकावर स्थानावर पोहोचलेले, तर आता अक्षरशः कंगाल झाले. फसवणुकीच्या आरोपाखाली दोन्ही सिंग बंधूंवर खटले सुरू आहेत.
कर्जाच्या गर्तेत रुतले सिंग बंधू
दोन्ही भावांच्या पतनाची कहाणी 2008 मध्ये सुरू झाली. या वर्षी दोन्ही भावांनी रॅनबॅक्सीमधील जपानी कंपनी डायची सँक्योला 9,576 कोटींना आपला हिस्सा विकला आणि इतकी मोठी रक्कम उधळून टाकली. त्यानंतर दोघे कर्जाच्या गर्तेत अधिकच खोलवर रुतले आणि अखेरीस खुद्द रॅनबॅक्सीच इतिहासजमा झाली. 2016 पर्यंत भावांवर 13000 कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे वाढलेले आणि आज केवळ व्यवसायच संपुष्टात नाही आला तर, आपलं नावही खराब करून घेतलं.
पाकिस्तानातू भारतात स्थायिक झालेलं कुटुंब
पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील व्यावसायिक भाई मोहन सिंग यांचे, नातू मालविंदर आणि शिविंदर सिंग, जे भारताच्या फाळणीनंतर दिल्लीत स्थायिक झाले. भाई मोहन सिंग यांनी चुलत भाऊ रणजित सिंग आणि गुरबक्ष सिंगच्या मालकीची कर्जबाजारी कंपनी विकत घेऊन रॅनबॅक्सी ही औषध कंपनी सुरू केली. 1999 मध्ये वडील परविंदर सिंग यांच्या निधनानंतर मालविंदर आणि शिविंदर सिंग यांना रॅनबॅक्सीचा व्यवसाय वारसा हक्काने मिळाला.
तोट्यातून कर्जाच्या गर्तेत रुतत गेले सिंग बंधू
नंतर काळाने या दोन्ही भावांना असा घाव दिला की कंपनी तर दिवाळखोर झालीच पण, आता दोन्ही सिंग बंधूंवर फसवणुकीचे खटले चालवले जात आहेत. 2008 मध्ये रॅनबॅक्सीमधील जपानी कंपनी दाइची सँक्योला 9,576 कोटींना आपला हिस्सा विकला, तर 2009-10 मध्ये या रकमेपैकी 2000 कोटी रुपये कर्ज आणि कर फेडण्यात खर्च केले. याशिवाय 1,700 कोटी रुपये रेलिगेअर या बिगर-बँकिंग वित्तीय कंपनीत आणि फोर्टिस या रुग्णालयांच्या साखळीत 2230 कोटी रुपये गुंतवले. पण जागतिक मंदीमुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि कर्जबाजारी झाले. रेलिगेअर आणि फोर्टिसने साल 2010-14 दरम्यान आपल्या व्यवसायाचा विस्तार केला, पण मंदीमुळे कंपनीवरील कर्जाचे ओझे वाढले.
न्यायालयीन खटला हरल्यानंतर कर्ज वाढले
2012 मध्ये जपानी औषध कंपनी दाइचीने सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयात अपील दाखल केले, ज्यामध्ये सिंग बंधूंनी रॅनबॅक्सी करारामध्ये त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला गेला. करार झाल्यानंतर काही दिवसांतच, अमेरिकेने रॅनबॅक्सीची औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचा दावा करत आयातीवर बंदी घातली. आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाने त्या भावांच्या विरोधात निकाल देत, त्यांना दाइचीला नुकसान भरपाई म्हणून 500 दशलक्ष डॉलर्स देण्याचा आदेश दिला.
दिवाळखोरीचा अर्ज
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही भावांवर एकूण 13000 कोटींचे कर्ज वाढले, ज्याची परतफेड करण्यासाठी फोर्टिसमधील हिस्सा विकणे भाग पडले. सिंग बंधूनी केवळ दहा वर्षांत 22,500 कोटी रुपयांचे नुकसान सोसले. सप्टेंबर 2018 मध्ये शिविंदरने मोठा भाऊ मालविंदरवर छळ, फसवणूक आणि गैरव्यवस्थापनाचा आरोप करून त्याच्यापासून विभक्त झाल्याची घोषणा केली. 10 ऑक्टोबर 2019 रोजी पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली दोन्ही भावांना अटक केली. तर नंतर शिविंदर सिंगने NCLT कडे IBC कायद्यांतर्गत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला.
सिंग बंधूंचे पतन
नोव्हेंबर 2016 मध्ये मालविंदरने कर्जाची परतफेड करण्यासाठी फोर्टिसमधून कथितरित्या 473 कोटी रुपये हस्तांतरित केले, ज्याची चौकशी केली गेली. त्यानंतर, ऑगस्ट 2018 मध्ये थकबाकी न भरल्यामुळे धनकोंनी फोर्टिस आणि रेलिगेअरमधील शेअर्सची मागणी केली, परिणामी सिंग बंधू दोन्ही कंपन्यांवरील नियंत्रण गमावून बसले.

