या सगळ्यावर कहर म्हणजे अमेरिकी संघातील ज्या खेळाडूला वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले होते, त्या फोलारिन बालोगनवरील ‘रेड कार्ड’मुळे येणारी बंदी लांबणीवर टाकण्यास ट्रम्प यांनी भाग पाडले.
ट्रम्प यांचा स्वयंगोल महाराष्ट्र टाइम्स(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण’ या धारणेनुसारच सदैव वागत असतात. भारत-पाकिस्तान संघर्ष असो… रशिया-युक्रेन युद्ध असो… इराणवरील हल्ला असो… व्हेनेझुएलातील कारवाई असो… किंवा मग टेरिफचा मुद्दा, किंवा अगदी ‘नोबेल’ पुरस्कारचा सोस; त्यांचे वागणे त्याच रीतीचे. पण या युद्धाच्या अंगणासोबतच त्यांनी थेट फुटबॉलच्याच अंगणात उडी घेतली आहे. आपण अमेरिकेचे अध्यक्ष असताना वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा व्हावी आणि त्यावर आपले पूर्णपणे नियंत्रण असावे, असे ट्रम्प यांनी आधीच ठरवले असावे! आठ वर्षांपूर्वी ‘फिफा’चे अध्यक्ष गिआनी इन्फँटिनो यांना ट्रम्प यांनी ‘रेड कार्ड’ दाखवले होते, आणि आत्ता वर्ल्ड कप स्पर्धेच्या ड्रॉवेळी आपल्याला ‘फिफा शांतता पुरस्कार’ देण्यास ट्रम्प यांनी भाग पाडले.
या सगळ्यावर कहर म्हणजे अमेरिकी संघातील ज्या खेळाडूला वर्ल्ड कप स्पर्धेच्या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले होते, त्या फोलारिन बालोगनवरील ‘रेड कार्ड’मुळे येणारी बंदी लांबणीवर टाकण्यास ट्रम्प यांनी भाग पाडले. बालोगनला बोस्निया-हर्झेगोविनाविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या मांडीवर ढोपर मारल्यामुळे ‘रेड कार्ड’ दाखविण्यात आले होते. पण त्या ‘रेड कार्ड’पेक्षा ‘ट्रम्प कार्ड’ वरचढ ठरले. यातील महत्त्वाचा भाग असा की, ‘ट्रम्प कार्ड’मुळे खेळण्याची संधी मिळालेला बोलोगन याला सामन्यात धड काही करणे जमलेच नाही. विरोधी संघ बेल्जियमने ४-१ असा एकतर्फी विजय मिळवत अमेरिकेचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणले. त्यामुळे अमेरिकेने नि स्वतः ट्रम्प यांनी स्वयंगोल करून घेतला तो वेगळाच.
या निमित्ताने ट्रम्प यांची धटिंगण वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अर्थात, या स्पर्धेवरील राजकीय दबाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या निमित्ताने सन १९३४मध्ये मुसोलिनी यांच्या नियंत्रणात झालेल्या स्पर्धेची आठवण येणे अपरिहार्य. त्या स्पर्धेत मुसोलिनी यांनी सातत्याने रेफरींची भेट घेत इटलीच कशी जिंकेल, असे बघितले होते. अर्थात, मुसोलिनी काय, किंवा ट्रम्प काय… या व्यक्ती नव्हे, तर प्रवृत्ती, असतात हे लक्षात घ्यायला हवे. येथे प्रश्न उभा राहतो तो ‘फिफा’सारख्या संस्थेच्या वृत्तीचा. इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत एखाद्या देशाचा अध्यक्ष या तऱ्हेची ढवळाढवळ कशी करू शकतो? ‘फिफा’ने हे वेळीच रोखायला हवे. फोलारिन बोलोगनला चुकीच्या पद्धतीने संधी मिळाल्याचे दुःख आहेच; पण ट्रम्प प्रवृत्ती सोकावते, हे त्याहीपेक्षा मोठे दुःख.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा