Headlines

maharashtra live news 29th august 2026 maharashtra mumbai update fda tukaram mundhe raid manoj jarange patil Nepal floods incident; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Nepal Flood : मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेर

कितीतरी मेसेज पाठवले तरी एकच ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज झालेला नसेल का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या गटासोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नाहीये… नेपाळमधील पुरानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांची अशीच घालमेल सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ८५ भारतीयांची सुटका झाल्याची माहिती मिळाली असली, तरी महाराष्ट्रातील, त्यातही प्रामुख्याने मुंबई, पुण्याच्या एका गटातील पर्यटकांबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एखादा तरी फोन येईल, कुठूनतरी काहीतरी कळेल, या आशेवर नातेवाईक आहेत. ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत