घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले असून, यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत दिली आहे. सबसिडी चालू ठेवण्यासाठी आणि गॅस सेवा खंडित होऊ नये म्हणून ग्राहकांना आता कोणत्याही गॅस एजन्सीच्या दारात रांगेत उभे न राहता घरबसल्या अत्यंत सोप्या डिजिटल पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करता येईल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

देशातील सर्व घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच e-KYC करणे अनिवार्य केले आहे. स्टोरीबोर्ड १८ च्या अधिकृत वृत्तानुसार, ज्या ग्राहकांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही या मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार नाही आणि गॅस सबसिडी देखील बंद होऊ शकते.
घरबसल्या ऑनलाईन E-KYC करण्यासाठी आवश्यक गोष्टी
- ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- ग्राहकाचा 12 अंकी आधार क्रमांक.
- आधार कार्डशी लिंक असलेला सक्रिय मोबाईल नंबर (ज्यावर ओटीपी येईल).
- बायोमेट्रिक फेस स्कॅनिंगसाठी गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेले केंद्र सरकारचे Aadhaar FaceRD अधिकृत ॲप.
मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
- गॅस कंपनीचे ॲप डाउनलोड करा: तुमच्याकडे ज्या कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, त्यानुसार प्ले स्टोअरवरून अधिकृत ॲप डाउनलोड करा. (उदा. Indane साठी IndianOil One, Bharat Gas साठी Hello BPCL, आणि HP Gas साठी HP Pay ॲप).
- लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन करा: ॲप ओपन करून गॅस कनेक्शन घेताना नोंदणीकृत केलेला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. नवीन युझर असल्यास ‘Register Now’ वर क्लिक करून खाते तयार करा.
- E-KYC चा पर्याय निवडा: ॲपच्या मुख्य मेनूमध्ये किंवा प्रोफाईल सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ‘Link Aadhaar’ किंवा ‘Aadhaar Authentication / e-KYC’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आधार तपशील भरा: तुमचा आधार नंबर प्रविष्ट करा आणि स्क्रीनवर दिलेल्या अटी व शर्तींच्या चौकटीवर टिक करा. यानंतर तुमच्या लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून पडताळणी करा.
- चेहरा स्कॅन करा: आता ‘Face Scan’ या पर्यायावर क्लिक करा. हे तुम्हाला थेट ‘Aadhaar FaceRD’ ॲपवर रीडायरेक्ट करेल. कॅमेऱ्यासमोर व्यवस्थित उजेडात येऊन डोळ्यांची उघडझाप करा. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्याच व्यक्तीचा चेहरा स्कॅन करणे आवश्यक आहे.
- सबमिट करा: चेहरा यशस्वीरीत्या स्कॅन झाल्यानंतर आधार डेटाशी पडताळणी केली जाईल आणि तुमची ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन स्क्रीनवर यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल.

