Headlines

LPG Cylinder Price Today 1 August: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! घरगुती गॅसच्या दराच काय?


LPG Cylinder Price Cut: ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. हॉटेल्स, रेस्तराँ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर कमी झाला असून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मात्र कायम आहे.

LPG Cylinder Price Cut 1 August 2026
महिन्याच्या पहिल्याच दिवस LPG स्वस्त झाला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आजपासून ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आहे आणि नवीन महिन्याचा पहिला दिवस आनंदवार्ता घेऊन आला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला असून यासह नवीन महिन्याची सुरुवात मोठ्या दिलासादायक झाली. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तयारींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी संसदेत वरिष्ठ मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत जवळपास 2 तास चाललेल्या उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर ही घडामोड समोर आली.

सलग दुसऱ्या महिन्यात LPG स्वस्त झाला

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली असून 200 पेक्षा जास्त रुपयांनी स्वस्त झाला आहे. एलपीजीचे नवीन दर 1 ऑगस्ट 2026 पासून लागू झाले आहेत मात्र, यावेळीही 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी गेल्या महिन्यात, जुलैमध्येही व्यावसायिक सिलिंडरच्या घरात कपात केली गेली होती. पश्चिम आशियात इराण युद्ध आणि व्यापक मध्यपूर्वेतील संकटाशी संबंधित पुरवठ्याच्या चिंतेमुळे जागतिक एलपीजीच्या किमती वाढल्याने गेल्या काही महिन्यांतील मोठी दरवाढ या सुधारणेमुळे अंशतः कमी झाली.

Maharashtra TimesTenant Rights: भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक
अशाप्रकारे, अलीकडच्या सुधारणेनंतर मुंबईत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2,031 रुपयांना मिळेल तर, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 941.50 रुपयांवर स्थिर राहली आहे.

एलपीजी आयातीवर सरकारचा नवीन प्लॅन

या दरम्यान, भारत 2027 पर्यंत आपल्या एकूण LPG आयातीपैकी एक-चतुर्थांश आयात अमेरिकेकडून करण्याची योजना आखत असल्याचा 28 जुलै रोजी प्रसिद्ध अहवालातून रॉयटर्सने दावा केला होता. ऊर्जा पुरवठ्यासाठी पश्चिम आशियाई देशांवरील अवलंबित्व कमी करणे आणि अमेरिकेसोबत व्यापारी संबंध दृढ करण्याचा यामागचा उद्देश आहे.

Maharashtra TimesIncome Tax: एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण
मध्य-पूर्वेकडून होणारा पुरवठा कमी झाल्यामुळे भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने अमेरिका आणि इतर पुरवठादारांकडून एलपीजीची ‘स्पॉट’ खरेदी (तात्काळ) वाढवल्याचेही अहवालतु समोर आले.

Maharashtra TimesKOSPI Crash: 4 कोटींचा नफा, साडे चार कोटी नुकसान! कुणी फ्लॅट गमावला तर कुणी आयुष्यभराची कमाई, कोरियन मार्केटमध्ये 40 टक्क्यांची घसरण
जून महिन्यात अमेरिकेकडून होणाऱ्या एलपीजी आयातीने पहिल्यांदाच 10 लाख टनांचा टप्पा ओलांडला, असे रॉयटर्सने सूत्रांचा अहवाला देऊन सांगितले. तसेच, ही आयात भारताच्या 2026 मधील 22 लाख टनांच्या सुरुवातीच्या वार्षिक करारातील उद्दिष्टापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा