जर तुमच्या भागात पीएनजी पाईपलाईन आहे आणि तरी तुम्ही LPG वापरत असाल तर तुम्हाला लवकरच तुमचे एलपीजी कनेक्शन कॅन्सल करावे लागणार आहे. राहत्या भागात पीएनजी पाईपलाईन असल्यास तेथील प्रत्येक नागरिकाने एलपीजी कनेक्शन रद्द करून पूर्णपणे पीएनजी कनेक्शनची जोडून घेणे बंधनकारक असणार आहे. जे नागरिक पीएनजी तसेच एलपीजी दोन्ही सेवांचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांचे एलपीजी कनेक्शन रद्द करण्यात येणार आहेत. एकंदरीत, पीएनजी पाईपलाईन असणाऱ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पीएनजी शिवाय पर्याय नाही.
PNG कनेक्शन नाही घेतले तर…
जर तुमच्या भागात पीएनजी पाईपलाईन असेल आणि तरीही तुम्ही पीएनजी कनेक्शन घेतले नाही तर प्रत्येक महिन्याला तुमच्या घरी येणारा एलपीजी सिलेंडर पुन्हा येणार नाही. तुमचे एलपीजी कनेक्शन पूर्णपणे रद्द केले जाईल. पण असे होण्याअगोदर तुम्हाला एक नोटीस येईल. हे नोटीस म्हणजे तुमच्यासाठी एक सावध पत्र! नोटीस आल्यावर तुम्हाला एलपीजी कनेक्शन सोडून पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल. तसेच चालू असणारे तुमचे एलपीजी कनेक्शन तुम्हाला तातडीने रद्द करावे लागेल. हे नियम त्या प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहेत, ज्याच्या राहत्या भागात पाईपलाईनद्वारे पीएनजीचा पुरवठा होतो.
भागात PNG पाईपलाईन नसल्यास…
जर तुमच्या राहत्या भागात पीएनजी पाईपलाईन नाहीये तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण हा नियम फक्त त्या नागरिकांसाठी आहे ज्या नागरिकांच्या राहत्या भागात पीएनजी पाईपलाईन उपलब्ध आहे. तुमच्या भागात पीएनजी पाईपलाईन नसेल तर तुमचे एलपीजी कनेक्शन सुरूच राहणार आहे. तुमच्या घरी होणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडर वितरणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
सरकारने हे नियम आणण्याचे काही विशेष कारण?
पश्चिम आशियाई देशांमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज या सागरी महामार्गात व्यापार करण्यात अडचणी येत आहेत. अशात भारत आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात एलपीजी आयात करतो. परंतु एलपीजी आयात साखळीवर तयार झालेला दबाव तसेच भविष्यातील संभाव्यता लक्षात घेता सरकारने देशांतर्गत नैसर्गिक गॅसच्या वापराला अधिक महत्त्व देण्याचे ठरवले आहे. जर देशात पीएनजीचा वापर वाढला तर एलपीजी आयात करण्याची गरज कमी होईल तसेच एलपीजी भारतात आल्यावर देशभरात त्याचे वितरण करण्यासाठी वाहतुकीवर येणारा भार टाळता येईल.
भारत-अमेरिका ट्रेड डील अंतिम टप्प्यात, मग काम अडतंय कुठे? 100% Tariff वरही केला खुलासा, US Ambassador स्पष्टच म्हणालेसामान्य नागरिकांनाही पीएनजीचा मोठा फायदा
अगदी देशातल्या सामान्य नागरिकांनाही पीएनजीचा फायदा आहे. जर घरात पीएनजी कनेक्शन असेल तर सिलेंडर बुकींगचा त्रास कमी होईल. नागरिकांना डिलिव्हरीची वाट पहावी लागणार नाही. तसेच देशांतर्गत नैसर्गिक वायू असल्याने एलपीजीच्या तुलनेने पीएनजी स्वस्त असू शकते.

