Headlines

London Indian Origin Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Sid fall from Elephant and Castle Building Tower to Death; लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत, 36 व्या मजल्यावरुन पडल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू, यूकेमध्ये नाव कमवलेली अदिती परळकर कोण होती?


London Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Death : अदिती परळकर आणि त्यांचे पती राकेश पै हे मूळचे भारतातील असून नंतर लंडनमध्ये स्थायिक झाले. तिथे अदिती यांनी बांधकाम व्यवसायात सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली.

London Building Marathi Family Death Maharashtra Times
अदिती परळकर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लंडन : भारतीय वंशाच्या एका कुटुंबाचा लंडनमध्ये गूढ मृत्यू झाल्याच्या घटनेने मित्र, सहकारी आणि स्थानिक रहिवासी हादरले आहेत. मृतांमध्ये अदिती परळकर यांचाही समावेश आहे. त्या बांधकाम क्षेत्रातील एक प्रतिष्ठित सल्लागार होत्या. गुंतागुंतीच्या वैद्यकीय गरजा असलेल्या आपल्या लहान मुलाची काळजी घेत असतानाच त्यांनी युनायटेड किंगडममध्ये यशस्वी कारकीर्द घडवली होती. अशातच हसत्या खेळत्या कुटुंबाच्या अकाली मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या कुटुंबाने आत्मघात केला की अपघात झाला, हे अद्याप उलगडलेले नाही.

उंच इमारतीतून पडल्याने तिघांचा मृत्यू

दक्षिण लंडनमधील ‘एलिफंट अँड कॅसल’ येथील एका आलिशान निवासी इमारतीतील आपल्या अपार्टमेंटमधून जवळपास ४०० फूट खाली पडल्यामुळे ४६ वर्षीय अदिती, तिचे ४७ वर्षीय पती राकेश पै आणि त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा सिड यांचा २७ मे रोजी मृत्यू झाल्याचे आढळून आले. हे तिहेरी कुटुंब ४५ मजली इमारतीमधील ३६ व्या मजल्यावर राहत होते.

अदिती परळकर कोण होत्या?

अदिती परळकर या बांधकाम क्षेत्रातील ‘सीनियर कन्सल्टंट’ होत्या. त्यांनी युनायटेड किंगडममधील अनेक मोठ्या पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांवर काम केले होते. एक निष्ठावान व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. कामाप्रती असलेली त्यांची नितांत निष्ठा आणि गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याची त्यांची हातोटी यासाठी त्या ओळखल्या जात होत्या.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वरिष्ठ पदे भूषवली. लंडनमधील गजबजलेल्या हिथ्रो विमानतळाशी संबंधित प्रकल्पांसह बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये त्यांनी योगदान दिले.
Maharashtra TimesPlaza BEST Bus Accident : ब्रेक फेल झाले, टिळक ब्रिजच्या उतारावर वेग कमी करता आला नाही, म्हणून मी… प्लाझा बेस्ट बस अपघातातील चालकाचा जबाब
अदिती आणि त्यांचे पती राकेश पै हे मूळचे भारतातील असून नंतर लंडनमध्ये स्थायिक झाले. तिथे त्यांनी सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. मित्र परिवाराच्या मते, या दाम्पत्याला व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवर अत्यंत आदराची वागणूक मिळत असे.

लहान मुलाला वैद्यकीय समस्या

त्यांचा मुलगा ‘सिड’ याला लहानपणापासूनच आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याला लर्निंग डिसअॅबिलिटी, अंशतः शारीरिक व्यंग आणि मूत्रपिंडाचा आजार होता. त्याच्या या स्थितीमुळे त्याला विशेष देखभालीची गरज होती. त्यामुळेच त्याच्या बालपणातील बराचसा काळ त्याचे शिक्षण घरीच झाले.

मित्रांनी सांगितल्यानुसार, आपल्या कामाचा व्याप आणि आव्हानात्मक कारकीर्द सांभाळूनही अदितीनेच त्याच्या दैनंदिन देखभालीची आणि शिक्षणाची बहुतांश जबाबदारी पेलली.

London Building Marathi Family Death  Maharashtra Times (1)

भारतात आले, अल्पावधीत परतले

काही वर्षांपूर्वी, सिडसाठी विशेष वैद्यकीय उपचार, तसेच नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अधिक आधार मिळवण्याच्या उद्देशाने हे कुटुंब भारतात स्थायिक झाले होते.

मित्रांच्या म्हणण्यानुसार, सिडच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत करणे आणि अदितीला भक्कम आधार उपलब्ध करुन देणे हा या स्थलांतरामागचा उद्देश होता. मात्र, अनेक वर्षांच्या उपचारानंतर हे कुटुंब २०२५ मध्ये पुन्हा यूकेला परतल्याचे समजते. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते, सिडच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय गरजांची काळजी घेणे हे त्या कुटुंबासाठी एक मोठे आव्हान ठरले होते.

मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या, मनसे आक्रमक! संदीप देशपांडे यांचा कडक इशारा

त्या दोघांसाठीही हा तणाव खूप मोठा होता, पण विशेषतः अदितीला या परिस्थितीचा सामना करणे कठीण जात होते. युकेमध्ये तिचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तिची नोकरीही खूप धावपळीची होती, त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळणे तिच्यासाठी अत्यंत कठीण झाले होते, असे काही मित्रांनी सांगितले.

पती राकेश मित्रांच्या मदतीला धावणारे

मित्रांमध्ये ‘रॉबिन’ म्हणून ओळखले जाणारे राकेश पै यांनी आर्थिक सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी बार्कलेज, सँटांडर आणि डॉइश बँक यांसारख्या अनेक प्रमुख बँकिंग संस्थांसोबत काम केले होते. मित्रांच्या मदतीला धावून जाणारा दोस्त अशा शब्दात त्याचं वर्णन केलं जात आहे.
Maharashtra TimesJalgaon Accident : दैवदुर्विलास! कारची बाईकला धडक, गाडीतील वरमाय-वरपित्याचा करुण अंत, तर लग्न ठरलेल्या दुचाकीस्वार युगुलाचाही एकत्रच शेवट
२७ मे रोजी सकाळी ‘एलिफंट अँड कॅसल’ येथील एका निवासी इमारतीतून तिघे जण उंचावरुन पडल्याचे वृत्त मिळताच आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका पथके घटनास्थळी पोहोचली व त्यांनी जीव वाचवण्याचे प्रयत्न केले; मात्र, अदिती, राकेश आणि सिड यांना मृत घोषित करण्यात आले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा