Headlines

Lilly Chen FSH Technologies Success Story; वयाची 16 वर्षे भिक्षूकी करणाऱ्या मुलीने कसे उभारले 239 कोटींचे साम्राज्य? गुरूंनी दिलेला एक सल्ला आजही आठवतो

​Entrepreneur Success Story: एका गंभीर आजाराचे निदान झाल्यावर लिली चेन बौद्ध भिक्षुणी बनली. मग, दुसऱ्या एका भिक्षूच्या सल्ल्यानुसार आपला मार्ग बदलला आणि मेटा येथे अभियंता बनली. त्यानंतर, लिलीने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला, ज्याचे मूल्य आज कोट्यवधी डॉलर्समध्ये आहे.

Lilly Chen Who Once Was Buddhist Monk Built 25 Million USD Startup
एके काळी बौद्ध भिक्षू असलेल्या लिली यांनी 25 दशलक्ष डॉलर्सचा स्टार्टअप उभारला
Success Story: वयाच्या 16 व्या वर्षी बौद्ध भिक्षू, नंतर मेटा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरपासून ते एका स्टार्टअपच्या संस्थापक… अमेरिकेतील न्यू जर्सी येथे जन्मलेल्या लिली चेन यांची कारकीर्द रंजक राहिली. बिझनेस इनसायडरच्या अहवालानुसार लिली आणि तिच्या तीन बालमित्रांनी करोना काळात एक हॅकथॉन प्रकल्प तयार केलेला, जे 2021 मध्येFSH टेक्नॉलॉजीज (पूर्वी कॉन्टेंडा) बनले. तेव्हापासून ही कंपनी एका सरकारी तंत्रज्ञान स्टार्टअपमध्ये विकसित झाली, जी कामाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ॲक्सेंचर यांसारख्या नामांकित कन्सल्टिंग कंपन्यांशी स्पर्धा करत आहे.

239 कोटींची कंपनी उभारली

239 कोटींची कंपनी उभारली

FSH टेक्नॉलॉजीजने आतापर्यंत एकूण 2.5 कोटी डॉलर्स किंवा अंदाजे 239 कोटी रुपये निधी उभारला असून अलीकडील 2 कोटी डॉलर्सची ‘सीरीज ए’ निधी उभारणी फेरी, फिग्मा, नोशन, रॅम्प आणि लॅटिस यांसारख्या कंपन्यांमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी लॅची ग्रूम यांच्या नेतृत्वाखाली झाली. तसेच याआधी कंपनीने कॉन्ट्रेरी आणि अक्रू यांच्या नेतृत्वाखाली जनरल कॅटॅलिस्ट, स्क्रिबली आणि बेसिस सेट व्हेंचर्स यांच्या सहभागाने 50 लाख डॉलर्सचा सीड राऊंड उभारला होता. (प्रातिनिधिक फोटो)

16 व्या वर्षी बौद्ध भिक्षू बनलेल्या

16 व्या वर्षी बौद्ध भिक्षू बनलेल्या

वयाच्या 16 व्या वर्षी लिली चेन हायस्कूल ड्रॉपआउट झाल्या. त्यानंतर ग्रेव्हज डिसीज, एक स्वयंप्रतिरोधक रोग असल्याचे निदान झाले. लिलीचे कुटुंब सार्वजनिक आरोग्य विम्यावर अवलंबून होते आणि त्यांना चांगल्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा अभाव होता. लिलीच्या आई नेहमीच आध्यात्मिक होत्या आणि लिलीनेही भिक्षुणी व्हावे, असे त्यांनीच सुचवले. अशाप्रकारे, चेनने अमेरिकेत दीक्षा घेतली आणि त्यानंतर आपल्या आईसोबत ग्रामीण चीनमधील बौद्ध मठात राहायला गेली.

ऐकण्याची कला आत्मसात केली

ऐकण्याची कला आत्मसात केली

चेन यांनी सुमारे दोन वर्षे भिक्षू म्हणून दीक्षा घेतली, ज्यामध्ये चीनमधील एका मठात तब्बल सहा महिने राहिल्या. तिथलं राहणीमागं अगदी साधं होतं. भिक्षू ध्यान करण्यासाठी, शेती करणे, साफसफाई करणे, पाणी भरणे, आणि इतर घरगुती कामे करण्यासाठी पहाटे 3 वाजता उठायचे. तिथं वीजही नव्हती. लिली सांगतात की आपल्या समस्या सांगण्यासाठी लोक मठात भेट द्यायचे पण, भिक्षू नेहमीच उपाय नाही सुचवायचे, तर फक्त ऐकून घ्यायचे.

एका भिक्षूने महाविद्यालयात जायला प्रोत्साहित केले

एका भिक्षूने महाविद्यालयात जायला प्रोत्साहित केले

मठात राहताना चेन आपला बहुतेक वेळ वाचनात घालवायच्या. अखेरीस मठातील प्रमुख भिक्षूच्या लक्षात आले त्यांनी ‘तुला शिकायला आवडते का?’ असं विचारले. चेनने त्यांना सांगितले की अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालये सर्वात जास्त आठवतात, तेव्हा त्यांनी लिलीला अमेरिकेत परत जाऊन पुढील शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. (प्रातिनिधिक फोटो)

अमेरिकेत परतणं सोपं नव्हतं

अमेरिकेत परतणं सोपं नव्हतं

पण लिलीला अमेरिकेत परतणं सोपं नव्हतं. चेनकडे हायस्कूल डिप्लोमा नव्हता आणि कॉलेज प्रवेश प्रक्रियेबद्दल काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला GED मिळवून कम्युनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन नंतर दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचा त्यांचा प्लॅन होता, पण कॉलेज फेअरमधील एका भेटीमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

कोलोरॅडो कॉलेजमध्ये एन्ट्री

कोलोरॅडो कॉलेजमध्ये एन्ट्री

चेन स्थानिक कम्युनिटी कॉलेजच्या शोधात सार्वजनिक ग्रंथालयात आयोजित कॉलेज फेअरमध्ये गेली. इथं त्यांना ‘CC’ असं लेबल लावलेलं टेबल दिसलं आणि ‘कम्युनिटी कॉलेज’ असा अर्थ समजून तिथे थांबल्या. CC प्रत्यक्षात कोलोरॅडो कॉलेज, एक छोटे लिबरल आर्ट्स स्कूल होते. या अनोख्या प्रवासाबद्दल कळल्यावर टेबलवरील एका महिलेने चेनला ACT परीक्षा देऊन स्कोर ई-मेल करण्यास सांगितले. चेनला 36 गुण मिळाले, जो सर्वोच्च संभाव्य स्कोर होता.

त्या महिलेने चेनला ‘अर्ली डिसिजन’ अंतर्गत कोलोरॅडो कॉलेजमध्ये अर्ज करण्यास प्रोत्साहित केले. चेनने विचारले की ती हायस्कूल डिप्लोमाशिवाय अर्ज करू शकते का, तेव्हा तिला तिचे परीक्षेचे गुण सादर करण्यास आणि अनुभवाबद्दल एका वैयक्तिक निबंधात लिहिण्यास सांगितले गेले. अशाप्रकारे, चेनला प्रवेश मिळाला.

स्वतः कोडिंग शिकून मेटामध्ये रुजू

स्वतः कोडिंग शिकून मेटामध्ये रुजू

चेनने कॉलेजमध्ये असताना स्वतःहून कोडिंग शिकून घेतले. पदवी घेतल्यानंतर मार्क झुकरबर्गच्या मेटा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाल्या. मात्र, लवकरच चेनला नोकरीचा कंटाळा आला आणि एका वर्षानंतर FSH टेक्नॉलॉजीज सुरू केली. सरकारी टेक्नोलॉजीबाबत कंपनीच्या दृष्टिकोनावर चेनने मठात शिकलेल्या गोष्टींचा अजूनही प्रभाव आहे.

लिली चेनची कंपनी करते काय

लिली चेनची कंपनी करते काय

एफएसएच टेक्नॉलॉजीज शहरांत, शाळा जिल्हे आणि सरकारी संस्थांसाठी सॉफ्टवेअर विकसित करते, ज्यामध्ये मंद आणि कालबाह्य झालेल्या सरकारी तंत्रज्ञान प्रणाली बदलण्यावर कंपनीचा भर देते. ही कंपनी सरकारी कंत्राटांसाठी मोठ्या सल्लागार कंपन्यांशी स्पर्धा देखील करते आणि ॲक्सेंचरला अनेकदा आपला मुख्य प्रतिस्पर्धी मानले जाते. (प्रातिनिधिक फोटो)

कंपनीचे व्यवसाय मॉडेल काय

कंपनीचे व्यवसाय मॉडेल काय

एफएसएचचे व्यवसाय मॉडेल पारंपरिक सल्लागार कंपन्यांपेक्षा वेगळे असल्याचे चेन म्हणतात. कंपनी सल्लामसलतीच्या तासांसाठी शुल्क आकारत नाही, तसेच समर्पित विक्री प्रतिनिधी किंवा सल्लागारही नाही. त्यांनी म्हटले की, “सर्वात मोठ्या फरकांपैकी म्हणजे आमची प्रोत्साहन योजना. आम्ही सल्लामसलतीच्या तासांसाठी शुल्क आकारत नाही आणि आमच्याकडे समर्पित विक्री प्रतिनिधी किंवा सल्लागारही नाही. एफएसएचमधील प्रत्येकजण एक ‘निर्माता’ आहे.” मोठ्या कंपन्यांशी यशस्वी स्पर्धा करूनही सरकारी संस्था ॲक्सचेंजर यांसारख्या प्रस्थापित नावांची निवड का करत राहतात हे आपल्याला समजते, असे चेन म्हणाले.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा