Headlines

Learn Marathi Or This Will Be Your Fate Auto Rickshaw Video Goes Viral Amid Mumbai Language Row | ‘मराठी येत नाही म्हणून रिक्षावाला सोडतोय मुंबई’, रिक्षा ट्रेनमध्ये ढकलतानाचा VIDEO व्हायरल, RTOच्या कारवाईची होतेय चर्चा


Mumbai Viral Video: महाराष्ट्रातील मराठी-हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर ऑटो रिक्षा ट्रेनच्या सामान कक्षात ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मराठी न आल्यामुळे रिक्षाचालक मुंबई सोडून गावाकडे परतत असल्याचा दावा केला जात आहे.

Marathi language row Mumbai
(फोटो सौजन्य – @SitamarhiJila/x.com)
मराठी विरुद्ध हिंदी हा भाषिक वाद गेली अनेक दशकं मुंबईत सुरू आहे. अन् या वादामध्ये आता एक नवं प्रकरण समोर येतंय. राज्यभरातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालकांची RTOकडून तपासणी करण्यात आली. त्यांना किती मराठी येते, याबाबतची ही तपासणी होते. यामध्ये ज्यांना मराठी भाषा येत नव्हती, अशांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर एका ऑटो रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मराठी येत नसल्यामुळे हा ऑटोचालक पुन्हा आपल्या गावी परततोय, असं सांगितलं जातंय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय घडतंय?

हा व्हिडीओ pawanraja808080 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतून आलेले अनेक ऑटोचालक आहेत. पण ही मंडळी ग्राहकांसोबत मराठी भाषेत संभाषण करायला नकार देतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. बरं, या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक मोठं आंदोलनदेखील झालं होतं. याच पार्श्वभूमीवर RTOकडून ही भाषेसंदर्भात तपासणी करण्यात आली. आणि यामध्ये नापास झालेला रिक्षावाला आपल्या गावी परतत असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो रेल्वेच्या सामान कक्षात रिक्षा ठेवताना दिसतोय. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकरी काय म्हणताहेत?

हा व्हायरल व्हिडीओ खरोखरच मराठी येत नसल्यामुळे मुंबई सोडून जात असलेल्या रिक्षावाल्याचा आहे का? याबाबत कुठेही या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

असो, मुंबईतील बांद्रा, गोरेगाव, कुर्ला, दादर, बोरीवली, वडाळा आणि अंधेरी यांसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांवर ही तपासणी करण्यात आली. मात्र, नोटीस मिळाल्याने चालकांचे बॅज तात्काळ रद्द किंवा निलंबित केले जाणार नाहीत. चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान मिळवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच, पुढील कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा