Headlines

land scam worth over rs 1000 crores exposed in naigaon through fake documents and misuse of rights; अबब! तब्बल 1000 कोटींचा जमीन घोटाळा; बनावट कागदपत्रांचा झोल, शासकीय अधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा, प्रकरण काय?


Naigaon 1000 Cr Land Scam: नायगावमध्ये तब्बल एक हजार कोटींचा जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

land scam
land scam(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, वसई: बनावट कागदपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा नायगावच्या टिवरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह चार जणांवर नायगाव पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मुंबईतील धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि कंपनीचे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव बोरकर (६६) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. हेमंत पाटील आणि धर्मेश शहा यांनी २००८ पासून आपला विश्वास संपादन केला होता. मात्र, नायगाव येथील मौजे टिवरी येथील ६५.३३ एकर जमीन त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा विकली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जमिनीचे रितसर सात-बारा उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. कालबाह्य आणि रद्द झालेले मुखत्यारपत्र वापर वापरून तसेच बिगर-नोंदणीकृत कागदपत्रांआधारे अनेक सर्वे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Maharashtra TimesCrime News: नायजेरियन नागरिकांची धरपकड; नालासोपाऱ्यात 231 जण ताब्यात, कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त
बोरकर यांच्या संमतीशिवाय डीडीपीएल ग्लोबल प्रा. लि. आणि युनिकॉर्न इंका अँड इस्टेट प्रा. लि. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली. या घोटाळ्यात केवळ खासगी व्यक्तीच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरही ठपका ठेवण्यात आला आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Maharashtra TimesPalghar News: भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव
या प्रकरणी बुधवारी नायगाव पोलिस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दीपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा