Krutika Tulaskar : ‘रात्रीस खेळ चाले ३’ फेम कृतिका तुळसकरनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.

कृतिकानं सांगितला कठीण प्रसंग
मुलाखतीदरम्यान कृतिका तुळसकर म्हणाली की, ”रात्रीस खेळ चाले’ मालिका संपली आणि त्यानंतर मी हिंदीत बरंच काम केलं. पुढे २०२३ मध्ये मी एका मालिकेचं शूटिंग करत होते. १८ जानेवारीचा दिवस होता. मी सकाळी उठले आणि मला वेळेत सेटवर पोहोचायचं होतं. तेव्हा मला चेहऱ्याच्या उजव्या बाजूला काहीच हालचाल जाणवत नव्हती. ब्रश केल्यावर आपण चूळ भरतो तेव्हा उजव्या बाजूने माझ्या तोंडातून पाणी बाहेर यायला लागलं. माझा उजवा डोळा सुद्धा व्यवस्थित काम करत नव्हता. माझ्या घरी काम करणाऱ्या ज्या मावशी येतात, त्यांना मी विचारलं की, माझ्या चेहऱ्यात काही वेगळं वाटतंय का? तेव्हा त्यांनाही डोळ्यात बदल जाणवला आणि त्या म्हणाल्या पटकन डॉक्टरकडे जा.’
Shubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना
‘मी सोसायटीतल्या डॉक्टरकडे गेले. ते म्हणाले, उद्यापर्यंत बरी होशील, त्यांनी मला गोळ्या दिल्या. पण, मला वेगळंच काहीतरी वाटत होतं. त्यादिवशी मी माझ्या दोन मित्रांना भेटले. त्यांनाही हे सगळं वेगळं वाटलं. मग, त्यांच्या सल्ल्यानुसार मी न्यूरोलॉजिस्टकडे गेले. ते मला म्हणाले, याला ‘बेल्स पाल्सी’ (Bell’s palsy) म्हणतात, म्हणजेच चेहऱ्याचा पॅरालिसिस. मी म्हटलं ओके. आता मी बरी कशी होईन आणि कधी होईन? यावर डॉक्टर म्हणाले, ‘ते मी सांगू शकत नाही.’
‘तेव्हा माझ्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट होते. डॉक्टरांचं सगळं ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझ्या हातात तेव्हा काम होतं आणि Bell’s palsy चं निदान झालेलं. मी लगेच निर्मात्यांना फोन केला आणि ते म्हणाले, ‘उद्या तुझं शूट आहे, तू सेटवरच ये’ मी सेटवर गेले. त्यावेळी माझा डोळा बंदच होत नव्हता. डोळ्यात धूळ जाऊन माझा डोळा संपूर्ण लाल झाला होता. डोळ्यातून सतत पाणी येत होतं. सेटवर गेल्यावर माझा मेकअप वगैरे झाला. पण, डोळ्याजवळ मेकअपच राहतच नव्हता, सतत डोळ्यातून पाणी येत होतं. माझ्या चेहऱ्याची एक बाजू हलतच नव्हती. मला एका क्षणाला असं जाणवलं की, आपल्याला आता हे जमणार नाही. कारण, मला चेहऱ्यावर एक्स्प्रेशन्सच आणता येत नव्हते.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘मला खाता येत नव्हतं, पाणी पिता येत नव्हतं. या परिस्थितीत मी काय करू हेच मला समजत नव्हतं. तेव्हा मग निर्मात्यांशी बोलून मी काम थांबवण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही प्रोजेक्टचे माझे कॉन्ट्रॅक्ट साईन होते, तेही मला सोडावे लागले. मी कधी बरी होईन, मला काहीच माहिती नव्हतं. मग, मी रोज सकाळी उठायचे, रुटीन फॉलो करून डॉक्टरकडे जायचे. जवळपास तीन महिने झाले आणि यादरम्यान मी अनेक पुस्तकं वाचली, वेबसीरिज पाहिल्या. यातून मी हळूहळू सावरले. बरी झाल्यावर स्टेरॉइड्समुळे माझं वजन वाढलं होतं, केस गळत होते, स्किन खराब झाली होती, या सगळ्यातून नीट बरं व्हायला मला तीन वर्षे लागली.’ असं कृतिकानं शेवटी सांगितलं. ‘कलाकार’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृतिका बोलत होती.

