Headlines

Khavdya dongar case the mystery behind a familys tragic death how is the police investigation underway; खवड्या डोंगरप्रकरणी पोलिसांकडून तपासाला वेग, चांदगुडे कुटुंबाच्या घरी पथक दाखल


म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: तिसगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील खवड्या डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना आई-वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. यात मोबाइलच्या मागणीचे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस ही दुर्घटना नेमकी मोबाइल, कौटुंबिक वाद की अन्य काही प्रकारामुळे घडली, या दृष्टीने तपास करीत आहेत.

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मोबाइलचे हप्ते थकल्यावरून झालेल्या वादातून युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेश ठाकरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या टीमने चांदगुडे यांच्या घराची तपासणी केली. चांदगुडे परिवारातील सदस्यांकडून कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नसल्याचे गाढे यांनी सांगितले.

पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की या प्रकरणात नेमके कारण काय आहे, याबाबत आताच सांगता येणार नाही. मोबाइलचे कारण सांगितले जात आहे. ते एक कारण असू शकेल. सर्व बाजूंनी आम्ही तपास करीत आहोत.

मागणी करूनही सुरक्षा नाही

खवड्या डोंगरावर यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यामुळे डोंगराच्या बाजूने; तसेच धोकादायक कड्यांच्या ठिकाणी सुरक्षा कठडे, संरक्षक जाळ्या व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा तिघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

खवड्या डोंगराच्या धोकादायक कड्यावर उभ्या असलेल्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई हात जोडून विनवण्या करीत होती, तर वडील आक्रोश करून मनधरणी करीत होते. काही झाले, तरी मुलगा वाचला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत असताना वडिलांनी त्याला डोंगराच्या काठावरून ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र मुलाचा तोल जात असताना वडिलांनी त्याचे हात पकडण्याचा प्रयत्न करताना दोघेही खोल दरीत कोसळले. त्याचवेळी हात जोडून विनवण्या करणारी आई धावत दरीकडे आली आणि तिनेही बापलेकांच्या मागे दरीत उडी मारली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित नागरिकांचे मन हेलावले. काही वेळ परिसरात स्मशानशांतता होती.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत