Headlines

Kapuskonda Teaser : ‘नवरा माझा नवसाचा’नंतर 21 वर्षांनी सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर शेअर करणार स्क्रिन, ‘कापूसकोंडा’ चा टीझर समोर


Kapuskonda Teaser Out : नवरा माझा नवसाचा या सिनेमानंतर पुन्हा एकदा अभिनेते सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करणार आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला.

कापूसकोंडा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सिनेइंडस्ट्रीचा एक काळ गाजवला. त्यांचे एकामोगामाग एक असे अनेक सिनेमे सुपरहिट झाले. आता सचिन पिळगावकर यांचे थोडे वय झाले असले तरी त्यांची उर्जा या नवोदितांना लाजवेल अशी आहे. नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमानंतर सचिन पिळगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात सचिन पिळगावकर सह अभिनेता मधुराणी प्रभुलकरसुद्धा दिसेल. साधारण 20 वर्षांपूर्वी आलेल्या नवरा माझा नवसाचा या सिनेमात सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकरने एकत्र काम केले होते. आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा हे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. हे दोघे कापूसकोंंडा या नव्या मराठी सिनेमात एकत्र दिसतील.

माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या “कापूसकोंडा” या चित्रपटाची पहिली झलक खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आली आहे. येत्या 23ऑक्टोबरला “कापूसकोंडा” चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपटाची पहिली झलक पाहून प्रक्षकांची त्यासाठीची उत्सुकता वाढवणारी आहे.

Maharashtra TimesGirija Oak On Mother In Law : मी सासू बघून लग्न केलं, तिच्याशी जमणं खूप महत्त्वाचं होतं,असं का म्हणाली नॅशनल क्रश गिरीजा ओक?
“कापूसकोंडा” चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित, ऋषिकेश तुरई यांनी चित्रपटाची पटकथा, संवादलेखन केलं आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. गाणी संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सुरबद्ध केली आहेत तर पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील या चित्रपटाला लाभले आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. पॅनोरामा स्टुडिओज् प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज सह स्टोरीवाला फिल्म हा चित्रपट सादर करीत असून जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा.लि. नी “कापूसकोंडा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Maharashtra TimesJui Gadkari : 20 Feb 2020 च्या रात्री मी जी झोपले ते थेट ICU मध्ये जाग आली! कट्टर नॉनव्हेजिटेरियन जुई गडकरी कशी बनली शुद्ध शाकाहारी? सांगितलं कारण
अभिनेते सचिन पिळगांवकर व अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आले आहे. सचिन पिळगावकर याच्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटात मधुराणी गोखले यांनी कँडी ही मजेशीर भूमिका साकारली होती. आता कापूसकोंडा या चित्रपटातून सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकत्र आले आहेत.
“कापूसकोंडा” चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारी आहे. कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का? अशा व्हॉइसओव्हरनंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने पाहताना दिसतात, त्यानंतर भांडीकुंडी इतस्ततः पसरलेल्या खोलीत सचिन पिळगावकर, मांडीवर कुत्रा असल्याने भेदरलेले दिसतात. त्यामुळे या दोन प्रसंगांतूनच कथानकाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे यात शंका नाही.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची स्टार प्रवाहवरील मी सावित्री जोतीराव फुले या मालिकेत सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसली होती. तिची आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत मधुराणीने अरुंधती हे पात्र साकारले होते.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा