Headlines

Kangana Ranaut Harsh Reply On Tapsee Pannu Statement ; Kangana Ranaut On Tapsee Pannu : ही कसली स्वस्त कॉपी जन्माला घातली,तुमची मेहनत वाया! 8 वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा उफळला, कंगनाने भांडणात तापसी पन्नूच्या पालकांनाही खेचले


Kangana Ranaut Tapsee Pannu Fight : 8 वर्षांपूर्वी तापसी पन्नूच्या एका विधानावरुन कंगनासोबत वादाची ठिणगी निघालेली. आता तो वाद पुन्हा वर आला असून यावेळी कंगणाने त्यात तापसीच्या आईवडिलांनाही मध्ये ओढले आहे.

kangana ranaut (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोशल मीडियावरील एका कमेंटमुळे कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. या दोघींमधील सुमारे आठ वर्षांपूर्वी एक वाद झाला होता तो या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने तापसीवर सर्व मर्यादा ओलांडल्याचा आणि “निर्लज्जपणे तिच्या जडणघडणीची थट्टा केल्याचा” आरोप केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ.

अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘गांधारी’ या चित्रपटामुळेचर्चेत आहे. ‘आज तक’च्या एका कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला विचारण्यात आले की, तिने कंगनासोबतचे मतभेद मिटवले आहेत का?

कंगनासोबतच्या वादासंदर्भात तापसी पन्नूच्या वक्तव्यावरून वाद

यावर उत्तर देताना तापसी म्हणाली, “मी तिला भेटलेले नाही. जेव्हा हे मुद्दे पहिल्यांदा समोर आले, तेव्हाही मी तिला भेटले नव्हते आणि त्यानंतरही मी तिला भेटलेले नाही. तिच्याबद्दलचे माझे मत हे माझ्या संगोपनातून, माझ्या बोलण्याच्या पद्धतीतून आणि गोष्टींकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनातून दिसून येते, तर ती तिच्या मतावर ठाम आहे. त्यामुळे, आम्ही दोघी कुठून आलो आहोत हे पाहण्यासाठी आणि ठरवण्यासाठी हे पुरेसे आहे, असे मला वाटते.”

Maharashtra TimesRanveer Singh On Ambani : धुरंधर सुपरहिट होण्यामागे अंबानींचा हात, रणवीर सिंहचा खुलासा,आभार मानत म्हणाला- त्यांच्या मदतीमुळेच शक्य

कंगनाचा संताप — निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या

तापसी पन्नूचे विधान लगेचच व्हायरल झाले आणि ते कंगनापर्यंत पोहोचताच ती संतापली. तिने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून तापसी पन्नूवर कडाडून टीका केली. कंगना म्हणाली, “एक चीप कॉपी तिच्या आगामी ‘बी-ग्रेड’ चित्रपटाचा प्रमोशन करत फिरत आहे, तरीही नेहमीप्रमाणेच प्रसारमाध्यमांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र कंगना रणौतच राहिली आहे. आज, निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडून तिने माझ्या आई-वडिलांची आणि माझ्या संस्कारांची थट्टा केली आहे.”

kangana post on taapsee
कंगणा रणौतची तापसी पन्नूवरुन पोस्ट

तापसीच्या आई-वडिलांना यात ओढत, त्यांनी एक स्वस्त कॉपी का जन्मला घातली? असा सवाल

कंगनाने पुढे लिहिले, “माझा विश्वास आहे की सर्व पालक आपापल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करतात आणि मी कधीही आई-वडिलांना कोणत्याही वादात ओढत नाही; पण आज मला तिच्या आई-वडिलांनाही विचारायचे आहे, —माझ्या आई-वडिलांप्रमाणे ते एका मूळ व्यक्तिमत्त्वाला जन्म का देऊ शकले नाहीत? फक्त एक स्वस्त कॉपी का जन्मला घातली? तुमच्या प्रयत्नांची मला कीव येते.”

Maharashtra TimesKBC Winner Sushil Kumar : व्यसन नडलं, लोकांनी लुटलं! पत्नीने सावध करुनही दुर्लक्ष, KBC मध्ये 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार कंगाल, आता काय करतो?

कंगना रणौत आणि तापसी यांच्यातील वाद कधी सुरू झाला?

कंगना आणि तापसी पन्नू यांच्यातील वादाची सुरुवात 2018 मध्ये झाली. ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, एका मुलाखतीत तापसीला विचारण्यात आले की कंगना रणौतला कोणत्या गोष्टीची गरज आहे; त्यावर तिने “फिल्टर” (बोलण्यावर नियंत्रण) असे उत्तर दिले. या टिप्पणीमुळे कंगनाची बहीण रंगोली चंदेल संतापली आणि तिने तापसीवर टीका करत तिला कंगनाची “स्वस्त प्रत” (cheap copy) असे संबोधले होती.

चीप कॉपी, घराणेशाहीच्या वादावरून गदारोळ

हा वाद इतका वाढला की, एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तापसीसोबतच स्वरा भास्करलाही यात ओढले आणि त्या दोघींनाही “बी-ग्रेड अभिनेत्री” असे म्हटले. कंगना म्हणाली की, “मुव्ही माफिया” तापसी आणि स्वरा भास्कर यांच्यासारख्या अशा वीस बाहेरच्या अभिनेत्री सहज शोधू शकते, ज्या असे म्हणतील की केवळ कंगनालाच घराणेशाहीची समस्या आहे, तर त्या स्वतः मात्र करण जोहरला पसंत करतात. त्यानंतर, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून तापसी पन्नू आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक चकमक आणि सार्वजनिक वाद रंगला.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा