Headlines

jasprit bumrah ruled out of sri lanka test series akib nabi dar in contention; बुमराह नसला तरी लंकेचा गेम होणारच! कारण बीसीसीआय घातक गोलंदाज पाठवणार, पठ्ठ्याने दहाच मॅचमध्ये 60 विकेट काढलेत


India vs Sri Lanka, Bumrah Injury : फिटनेस चाचणी पास केल्यानंतरही जसप्रीत बुमराह श्रीलंका मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. डाव्या पायाच्या त्रासामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे.

jasprit bumrah akib nabi dar sri lanka test series
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला खूप मोठा झटका बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर पडला आहे. सुरुवातीला त्याने फिटनेस टेस्ट पास केल्याच्या आणि तो या सीरिजमध्ये खेळणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता तो अजूनही दुखापतग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

डाव्या पायाच्या त्रासामुळे घेतला निर्णय

जेव्हा मालिकेसाठी संघ घोषित झाला, तेव्हा बुमराहच्या नावापुढे ‘सब्जेक्ट टू फिटनेस’ असे लिहिलेले होते. बीसीसीआयच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये तो फिट असल्याचे समोर आले होते. मात्र, त्यानंतरही बुमराहने त्याच्या डाव्या पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली. त्यामुळे वैद्यकीय टीम आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याबाबतीत कोणतीही घाई न करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे बीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

आगामी मोठ्या मालिकांमुळे घेतला रिस्क न घेण्याचा निर्णय

खेळाडूंना घाईघाईत मैदानात उतरवल्यामुळे ते पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याची उदाहरणे आधी घडली आहेत. बुमराहबाबत असा कोणताही धोका पत्करायचा नाही, असे बीसीसीआयचे स्पष्ट मत आहे. या वर्षात एशियन गेम्स, न्यूझीलंड दौरा आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अशा अनेक महत्त्वाच्या मालिका भारताला खेळायच्या आहेत. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक राखण्यासाठी आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगल्या कामगिरीसाठी बुमराह पूर्ण १००% फिट असणे गरजेचे आहे.

Maharashtra TimesDuleep trophy 2026 : दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनचा संघ जाहीर! रजत पाटीदार कर्णधार, तर टीम इंडियातील फिनिशर उपकर्णधार, संघात आणखी कोणाला संधी?

बुमराहच्या जागेवर ‘आकिब नबी डार’चे नाव चर्चेत

बुमराह बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डार याचे नाव सर्वात पुढे आहे. आकिबने अजून भारतासाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये डेब्यू केलेला नाही. पण रणजी ट्रॉफी २०२६ मध्ये त्याने ६० विकेट्स घेऊन सर्वाधिकचा विक्रम केला होता आणि जम्मू-काश्मीरला पहिल्यांदा रणजी चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावली होती.

Maharashtra TimesAjinkya Rahane Pension : अजिंक्य रहाणेला निवृत्तीनंतर महिन्याला पेन्शनमध्ये BCCIकडून किती पैसे मिळणार? कोणत्या खेळाडूंना पेन्शन लागू होत नाही?

सिराज आणि प्रसिध कृष्णावर नवी जबाबदारी

श्रीलंका दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि गुरनूर ब्रार या चार वेगवान गोलंदाजांची निवड झाली होती. आता बुमराह बाहेर पडल्याने मोहम्मद सिराझ आणि प्रसिध कृष्णा यांच्यावर मुख्य जबाबदारी असेल. श्रीलंकेच्या परिस्थितीत भारतीय गोलंदाजी मजबूत असणे गरजेचे होते, पण बुमराहच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची अडचण वाढली आहे.