Headlines

Japans Weirdest Job Get Paid to Spend a Night in a Haunted House | भुतांनी पछाडलेल्या घरात १ रात्र राहून दाखवा, मिळतील ५५ हजार रुपये, पैशांसाठी कोण करेल भुतं शोधण्याची नोकरी?


Paranormal Investigation: जपानमधील Kachimode कंपनी कथित हॉन्टेड घरांची वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने तपासणी करून ती भुताटकीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देते. हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका रात्रीसाठी ५५ हजार रुपये दिले जातात.

Ghost Investigation
(ai generated images)
जगात भूतं आहेत की नाहीत, या प्रश्नावर गेल्या अनेक शतकांपासून वादविवाद सुरू आहेत. काहींच्या मते दैवी शक्तीप्रमाणेच आसुरी शक्तीदेखील असते, तर काहींच्या मते भूत ही केवळ एक अफवा आहे. गंमत म्हणजे भुतांच्या गोष्टी केवळ भारतातच नाही, तर युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही सांगितल्या जातात. आणि याच पार्श्वभूमीवर भुतांशी संबंधित एक अजब नोकरी सध्या चर्चेत आहे. जे लोक स्वतःला निडर मानतात आणि भुतांवर विश्वास ठेवत नाहीत, ते ही नोकरी सहज करू शकतात. या कामासाठी एक कंपनी एका रात्रीचे तब्बल ५५ हजार रुपये देत आहे.

नेमका हा प्रकार आहे तरी काय?

​ ​

आपल्या आसपास अशा अनेक पडीत जागा किंवा घरे असतात, जी हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखली जातात. त्या ठिकाणी भूतं आहेत, अतृप्त आत्मे फिरतात किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, असे सांगितले जाते. अशा अफवा हळूहळू सर्वत्र पसरतात आणि त्या जागेविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण होते. एखाद्या बिल्डरने त्या जागेवर इमारत बांधली तरी अनेकजण तेथे घर खरेदी करण्यास घाबरतात.

अशा हॉन्टेड जागांविषयी लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी जपानमधील Kachimode या प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीने ‘घोस्ट इन्व्हेस्टिगेशन’ ही सेवा सुरू केली आहे. हे काम करणाऱ्या व्यक्तींना कंपनी एका रात्रीसाठी ८८ हजार येन, म्हणजेच जवळपास ५५ हजार रुपये, देते.

या घोस्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये नेमकं काय केलं जातं?

या घोस्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये नेमकं काय केलं जातं?

समजा एखादं कुप्रसिद्ध घर आहे आणि त्या घरात भूतं आहेत, असा लोकांचा विश्वास आहे. अशा ठिकाणी Kachimode कंपनी आपले प्रशिक्षित कर्मचारी पाठवते. हे कर्मचारी व्हिडिओ कॅमेरे, ऑडिओ रेकॉर्डर, थर्मोग्राफी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिटेक्टर आणि इतर सेन्सर्सच्या मदतीने घराचे निरीक्षण करतात. हे निरीक्षण रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत केले जाते. तपासणीनंतर संबंधित घराबाबत सविस्तर अहवाल तयार केला जातो आणि भुताटकीचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

सध्या ही कंपनी केवळ जपानमध्येच कार्यरत आहे. मात्र, भविष्यात अशी एखादी कंपनी भारतातही सुरू झाली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण भारतातही अशा अनेक जागा आहेत, जिथे भुतांचा वावर असल्याचा दावा केला जातो. असो, पण तुम्ही अशा एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज कराल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(फोटो सौजन्य – Rıfat Gadimov/pexels.com)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा