Headlines

Jalgaon News: रक्षाबंधनापूर्वीच दोन कुटुंबांवर शोककळा; बापलेकाचा बुडून, तर तरुणाचा विजेच्या धक्क्याने करुण अंत, जळगाव हळहळलं


म. टा. वृत्तसेवा, अमळनेर: जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधनाआधी दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अमळनेर तालुक्यात बापलेकाचा बुडून, तर भुसावळमध्ये तरुणाचा गुरुवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून बापलेकाचा करुण मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास घडली. मुलगा पाण्यात उतरल्याचे लक्षात येताच त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी तलावात उडी घेतली; मात्र तलावातील गाळात दोघेही अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. अण्णा एकनाथ तलवारे (वय ३२) आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र ऊर्फ विरू अण्णा तलवारे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत.

Maharashtra TimesShilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोपविरू सकाळी तलावाजवळ खेळत होता. खेळता खेळता तो पाण्यात उतरला. ही बाब वडिलांच्या लक्षात येताच अण्णा तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. मात्र, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने दोघेही त्यात अडकले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. या निमित्ताने तलावातील गाळ आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अण्णा तलवारे व विरू मूळचे आर्वी (ता. जि. धुळे) येथील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या अण्णा यांची सासरी खवशी येथे वास्तव्यास होते. या घटनेमुळे तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Maharashtra TimesSolapur Crime : 42 वर्षीय विवाहितेचं 27 वर्षीय तरुणाशी इन्स्टावर सूत जमलं, मुलगा-नवऱ्याला सोडून आली, लग्नाचा तगादा, प्रियकराची दुर्दैवी अखेरतीन बहिणींचा आधार गेला

जळगाव : भुसावळ येथे वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय ३५) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. तापी नगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ते डीएस कॉम्प्लेक्सजवळील ११ केव्ही कट पॉइंटवरील फॉल्ट तपासत होते. त्या वेळी त्यांना तीव्र धक्का बसला. रक्षाबंधनापूर्वी तीन बहिणींचा एकुलता भाऊ हिरावल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

Maharashtra TimesNanded Crime: काका-पुतणीच्या नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष दाखवून २ वर्षांच्या चिमुकलीवर काकाचा अत्याचारकार ओढ्यात कोसळून दोन ठार

भरधाव कार दुभाजकाला धडकून रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळून झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील वाकसई गावच्या हद्दीत सुरज ढाब्यासमोर गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे सव्वाचारच्या दरम्यान ही घटना घडली. हुसेन शब्बीर गोधरावाला (वय २७, रा. कोंढवा) आणि आसीर असगरअली इनामदार (वय २६, रा. नेहरुनगर, पुणे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कारचालक अनिकेत गौतम बरवा असे जखमीचे नाव आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत