मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये इंग्लंडने ५० ओव्हरमध्ये ३८७-३ धावांचा डोंगर उभारला. लॉर्ड्स मैदानावर वनडे क्रिकेट इतिहासामधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना धुतले. बुमराह खेळत नसल्याचा पूर्णपणे फायदा घेत इंग्लंडने भारताच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. आजच्या सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेट याने १३५ चेंडूत १४१ धावांची शतकी खेळी केली. तर जेकब बेथल ९३ धावा, जो रूट ७४ धावा आणि शेवटला जोस बटलर याने ४१ धावांची आक्रमक खेळी करत गोलंदाजांची पिसं काढून टाकली. भारत हे आव्हान पूर्ण करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएलमध्ये स्टार्स राहिलेले युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पडल्याचं दिसून आलं.
इंग्लंडकडून सलामीला आलेल्या जेकब बेथल आणि बेन डकेट यांनी १९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. आतापर्यंतची लॉर्ड्सवरची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या ऐतिहासिक मैदानावर १९२ धावांची सलामीची भागीदारी केल्याचा लाजिरवाणा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. बेन डकेट याने १३५ चेंडूत १४१ धावा (१८ चौकार, १ षटकार), जेकब बेथल ९३ चेंडूत ९१ धावा (११ चौकार, २ षटकार) दोघांनी आधी भारताच्या गोलंदाजांना आघाडी घेण्याची संधी दिली नाही. जो रूट आजही नाबाद राहिला, ४८ चेंडूत ७४ धावा आणि शेवटी आलेल्या जोस बटलर याने अवघ्या १३ चेंडूत ४१ धावांची तुफानी खेळी करत संघाला ३९० च्या जवळपास पोहोचवले. IND vs ENG 3rd ODI Playing 11 : इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघात 3 मोठे बदल, जसप्रीत बुमराह बाहेर; कोणाची एन्ट्री? भारताच्या गुरनूर ब्रार याने १० ओव्हरमध्ये तब्बल ९७ धावा दिल्या, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. दोन विकेट घेतलेल्या प्रसिद्ध कृष्णा यानेही १० ओव्हरमध्ये ६९ धावा मोजल्या. अर्शदीप सिंगसारखा अनुभवी गोलंदाजही आज विकेटलेस गेला, त्याने १० ओव्हरमध्ये ७२ धावा बहाल केल्या. एकमेव स्पिनर असलेल्या अक्षर पटेलनेही ६१ धावा देताना एकही विकेट घेतली नाही. PV Sindhu : सिंधू इज बॅक! पोरीने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, दोन सेटमध्येच प्रतिस्पर्धी खेळाडूचा करेक्ट कार्यक्रम दरम्यान, भारतीय संघाला आजचा सामना करण्यासाठी इतिहास रचावा लागणार आहे. कारण भारताने १३ वर्षांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३६० धावांचे टार्गेट पूर्ण केले होते. मात्र आज ३८८ धावांचे टार्गेट भारतासमोर असणार असून हे पूर्ण करण्यात भारतीय संघ पूर्ण करतो की नाही हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय संघ प्लेइंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (C), विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड संघ प्लेइंग 11 : बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रुक (C), जोस बटलर (WK), सॅम करन, विल जॅक्स, गस एटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा