Indian Family Dies: अमेरिकेत भारतीय कुटुंबाचा करुण अंत झाला आहे. मोटलला लागलेल्या आगीत त्रिकोणी कुटुंबाचा शेवट झाला. उत्तम भविष्य घडवण्यासाठी २ वर्षांपूर्वीच हे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं होतं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या मॅसाच्युएट्स राज्यातील वूस्टर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. इकोनो लॉज मोटलला लागलेल्या भीषण आगीत गुजरातच्या खेडा जिल्ह्याचे मूळ निवासी असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी शेवट झाला. त्रिकोणी कुटुंबाच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे. तिघांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
हितेशभाई सुथार, त्यांची पत्नी हिनाबेन सुथार आणि २० वर्षीय कन्या ईशानी सुथार अशी मृतांची नावं आहेत. उत्तम भविष्यासाठी कुटुंबानं २ वर्षांपूर्वी भारत सोडला आणि त्यांनी अमेरिकेतच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हितेशभाई इकोनो लॉज मोटलमध्ये काम करायचे आणि त्यांचं कुटुंब मोटल परिसरातच वास्तव्यास होतं. Indian Sailor Dies: किडनी, हृदय, फुफ्फुस..; व्हेनेझुएलाच्या समुद्रात भारतीय खलाशासोबत घातपात? बॉडीमधून 21 अवयव गायब रविवारी रात्री उशिरा दीडच्या सुमारास मोटलमध्ये अचानक आग लागली. त्यानंतर कुटुंब एका खोलीत अडकलं. धोका लक्षात येताच त्यांनी मोटलच्या फ्रंट डेस्कवर कॉल करुन मदत मागितली. खोलीतील बाथरुममध्ये जाण्याचा सल्ला त्यांना फ्रंट डेस्ककडून देण्यात आला. बाथरुममध्ये जा, पाणी सुरू ठेवा आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे धूर आणि आगीपासून तुमचा बचाव होईल, असं फ्रंट डेस्ककडून सांगण्यात आलं. त्या सूचनांचं पालन सुथार कुटुंबानं केलं. त्यांनी तातडीनं बाथरुम गाठलं आणि बचाव पथकाची वाट पाहण्यास सुरू केली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यास आणि मदत-बचाव कार्य सुरू करण्यास बराच वेळ लागला. हा विलंब सुथार कुटुंबाच्या जीवावर बेतला. या कालावधीत खोलीत धूर पसरला. त्यामुळे हितेशभाई, हिनाबेन आणि त्यांची लेक ईशानी यांचा शेवट झाला. जीव वाचवण्यासाठी फ्रंट डेस्कनं त्यांना बाथरुममध्ये जाण्याचा सल्ला त्यांच्या जीवावर बेतला. श्वास गुदमरल्यानं तिघे दगावले. Europe Heatwave: भीषण उष्णता, त्यात ‘सायलेंट किलर’चा धोका; 1300 जणांचा अंत; एसी, पंखे खरेदीसाठी लोकांची झुंबड सुथार कुटुंबाच्या निधनाचं वृत्त त्यांच्या मूळ गावी पोहोचताच नडियाद आणि खेडावर शोककळा पसरली. कुटुंबाचे नातेवाईक, मित्र परिवार, स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली. आग लागण्यामागील नेमक्या कारणांचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. मृतांचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी नातेवाईक अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा