Headlines

Indian Couple Leaves Plant Pots for Months in America Marathi Womans Story Goes Viral | अमेरिकेत आल्यावर भारतीय लोक विचित्र का वागतात? मराठी महिलेनं केलं एक्सपोझ, ‘कुंड्या ठेवून झाले गायब’


Viral Instagram Video: अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी महिलेने भारतीय जोडप्यासोबतचा विचित्र अनुभव शेअर केला आहे. त्या जोडप्याने तिच्या मैत्रिणीकडे रोपट्यांच्या कुंड्या ठेवण्यासाठी दिल्या. मात्र, सात महिने उलटूनही त्या परत नेल्या नाहीत किंवा साधी ओळखही दाखवली नाही.

Indians in America
(फोटो सौजन्य – thethamkefamilyineurope/Instagram)
युरोप-अमेरिकेत गेल्यानंतर भारतीय लोकं कधी कधी फारच विचित्र वागतात. असे काही व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिले असतील, ज्यामध्ये लोक तक्रार करताना दिसतात की, भारतीय लोकं समोरासमोर भेटून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण दुसरीकडे स्थानिक विदेशी मात्र मोठ्या उत्साहाने त्यांच्याशी संवाद साधतात.

असो, पण या अनुभवांच्या यादीत आता आणखी एका विचित्र प्रकाराची भर पडली आहे. एका मराठी महिलेने अमेरिकेतील तिचा अनुभव सांगितला आहे. एका भारतीय जोडप्याने तिच्या मैत्रिणीकडे घरातील रोपटी काही दिवस ठेवण्याची विनंती केली होती. पण आज त्या रोपट्यांची मोठी झाडं झाली आहेत. मात्र, ते जोडपं आता साधी ओळखही दाखवत नसल्याचं तिनं सांगितलं.

नेमकं घडलं काय?

नेमकं घडलं काय?

हा व्हिडिओ thethamkefamilyineurope या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एका भारतीय जोडप्याकडून आलेला विचित्र अनुभव सांगते. तर घडलं असं की, तिच्या मैत्रिणीच्या इमारतीत एक भारतीय जोडपं राहायला आलं होतं. मायदेशातून आल्यामुळे तिच्या मैत्रिणीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण काही महिन्यांनंतर त्या जोडप्याने अचानक तिच्या मैत्रिणीची भेट घेतली आणि आपल्या घरातील रोपट्यांच्या कुंड्या काही दिवसांसाठी तुमच्या घरी ठेवण्याची विनंती केली.

कुंड्यांमधील रोपटी फारच लहान होती, त्यामुळे मैत्रिणीने होकार दिला. मात्र, त्या जोडप्याने एके दिवशी गुपचूप आपल्या कुंड्या तिच्या घरासमोर आणून ठेवल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच तिच्याशी संपर्क साधला नाही. किंवा ओळखही दाखवली नाही. किंबहुना, त्या कुंड्या ठेवून आता तब्बल सात महिने उलटून गेले आहेत. पण ते जोडपं तिला पुन्हा कधीच दिसलं नाही. जणू ते अमेरिका सोडूनच गायब झालं की काय असं वाटतेय.
(फोटो सौजन्य – Tugay Ekinci/pexels.com)

भारतीय लोक विचित्र का वागतात?

​ ​

हा व्हिडिओ ५० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अमेरिकेत राहात असलेल्या इतर काही लोकांनी सुद्धा त्यांच्यासोबत घडलेले असेच किस्से शेअर केले आहेत. काही जण म्हणत आहेत की, काही भारतीयांना आपली ओळख दाखवायला आवडत नाही. ते मुद्दाम आपल्या देशातील लोकांपासून शक्य तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करतात. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे?

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा