India vs Sri Lanka 2 Match Test Series BCCI Announced 15 Players Squad Ravindra Jadeja Saransh Jain Shubhman Gill; जड्डूचं पुनरागमन, 33 वर्षीय सारांशला पहिल्यांदा संधी; श्रीलंका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
India vs Sri Lanka 2 Match Test Series BCCI Announced 15 Players Squad Ravindra Jadeja Saransh Jain Shubhman Gill; जड्डूचं पुनरागमन, 33 वर्षीय सारांशला पहिल्यांदा संधी; श्रीलंका कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
Team India Squad vs Sri Lanka Test Series : बीसीसीआयने आज श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना संघ जाहीर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची दणक्यात घोषणा केली आहे. शुभमन गिलकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं असून केएल राहुलची उपकर्णधारपदी वर्णी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल आठ महिन्यांनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं कसोटी संघात दिमाखात पुनरागमन झालं आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा अंतिम सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे.
262 दिवसांनंतर पुनरागमन
श्रीलंका मालिकेसाठी संघ निवडण्यापूर्वी रवींद्र जडेजाला संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. जडेजानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आलं होतं. मात्र, आता तो पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. भारताचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना 15 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी जडेजा तब्बल 262 दिवसांनंतर कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे.
अंतिम एन्ट्री त्यांच्या फिटनेसवर अवलंबून
बीसीसीआयनं जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश केला असला, तरी दोघांची अंतिम एन्ट्री त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर बुमराहच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मालिकेतील निर्णायक सामना गमवावा लागला होता. बुमराह आणि सुदर्शन यांना सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी मिळेल. तसेच अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही बीसीसीआयनं दिली. Team India : भारताला झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत 3 प्रश्नांची उत्तरे मिळाली, कोच लक्ष्मणच्या एण्ट्रीनंतर विजयाचा श्रीगणेशा, जाणून घ्या
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा , कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा