Headlines

india vs australia womens t20 world cup semifinal equation; फक्त ऑस्ट्रेलियाला हरवणं पुरेसं आहे का? सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला नेमकं काय करावं लागेल?


IND W vs AUS W : महिला टी-२० विश्वचषकात २०२६ मध्ये उद्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामना आहे. भारताने हा सामना जिंकल किवा भारताचा पराभव झाला किंवा पावसामुळे सामना रद्द करावा लागला तर भारताच्या सेमीफायनलची संधी कशा बदलतील, कसं असेल संपूर्ण समीकरण?

india vs australia womens t20 world cup semifinal Scene
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय महिला संघासमोर आता विश्वचषकातील सर्वात मोठी परीक्षा आहे. उपांत्य फेरीचे स्वप्न जिवंत ठेवायचे असेल, तर रविवार (२८ जून) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा ‘करो या मरो’ सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर रंगणार आहे. मात्र, भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण केवळ या सामन्यावरच नाही, तर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील लढतीवरही अवलंबून असणार आहे.

सध्या अ गटात ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. मात्र, नेट रनरेटमुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश अद्याप शर्यतीत असला, तरी त्याचे आव्हान कठीण आहे.

भारत जिंकला तर काय होईल?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर त्यांचे आठ गुण होतील आणि कोणत्याही अन्य निकालाची वाट न पाहता भारत थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. अशा वेळी दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सामन्याचा निकाल भारतासाठी महत्त्वाचा ठरणार नाही.

Maharashtra TimesIND vs IRE: आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया ढेपाळली, पण सूर्या दादाकडून एकाचं जाम भारी कौतुक; काय म्हणाला माजी कर्णधार?

भारत हरला तर दुसऱ्या सामन्याकडे लागेल लक्ष

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला हरवले, तर दक्षिण आफ्रिकेचे आठ गुण होतील. भारत सहा गुणांवरच राहिल्याने स्पर्धेबाहेर जाईल. मात्र, भारत हरला आणि बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला, तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तिन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण होतील. अशा वेळी नेट रनरेटच्या जोरावर भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकते.

पाऊस झाला तर समीकरणं बदलतील

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे सात गुण होतील. अशा परिस्थितीत भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवणे अनिवार्य ठरेल. भारताचा पराभव झाल्यास त्यांचे सहाच गुण राहतील आणि दक्षिण आफ्रिका पुढे जाईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारताच्या खात्यात सात गुण जमा होतील. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे आठ गुण होत असल्याने भारताचे आव्हान संपुष्टात येईल.

पण बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारत-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर भारत सात गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारेल. त्यामुळे या गटातील अखेरच्या दोन्ही सामन्यांवर भारतीय चाहत्यांच्या नजरा असतील.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा