LPG गॅससाठी आखाती देशांवरचे अवलंबित्व का घटले?
सध्या जगभरात युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिका-इराण या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवरही जाणवत आहे. आधी भारत LPG साठी आखाती देशांवर अवलंबून होता. देशातील LPG गॅसचा सगळ्यात मोठा वाटा हा आखाती देशांकडून आयात व्हायचा. पण वाढते तणाव पाहता, स्ट्रेट ऑफ होर्मूझ या सागरी वाटेत इराणकडून हस्तक्षेप होण्याचा धोका वाटत आहे. जर इराणने तसे केले तर भारतात LPG चा तुटवडा भासू शकतो. परिणामी, देशात LPG गॅस सिलेंडरच्या किंमती आणखीन वाढतील.
हे स्ट्रेट ऑफ होर्मूझ नक्की आहे तरी काय?
स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा आखाती देशांसाठी फार महत्वाचा सागरी मार्ग आहे. याच मार्गातून आखाती देशातील कच्च्या तेलाची आयात-निर्यात केली जाते. पर्शियन गल्फ आणि ओमान गल्फ यांना जोडणारी ही अरुंद सागरी वाट आहे. अशामध्ये वाढत्या तणावामुळे होर्मूझ या सागरी मार्गात इराणने हस्तक्षेप केला तर जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताने आखाती देशांपेक्षा इतर देशांकडून LPG आयात करण्याचा विचार केला आहे.
आता या देशांकडून होणार एलपीजी, एलएनजी तसेच क्रूड ऑइलची आयात
होर्मुझ या मार्गावर असणाऱ्या संभाव्य संकटाला लक्षात घेऊन अमेरिकेने LPG, LNG तसेच Crude Oil चे सप्लायरच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाच्या सुरुवातील भारत अमेरिकेतून 10% LPG आयात करेल असे समोर आले होते. परंतु परिस्थिती लक्षात घेता, आता अमेरिकेकडून 67% LPG ची आयात केली जाणार आहे. फक्त LPG नव्हे तर आता अमेरिका भारताला LNG सप्लाय करणाऱ्यांच्या यादीतही पहिल्या स्थानी आहे. या यादीत आधी पहिल्या स्थानी असणाऱ्या कतारला अमेरिकेने मागे टाकले आहे. मे-जुलै 2026 मध्ये कतारकडून LNG Import मध्ये सुमारे 91% ची घट झाली आहे. तर ओमानकडून LNG Import मध्ये 341% वाढ नोंदवण्यात आली आहे.
Iran News: ते खरंच सर्वोच्च नेते होते का? अंधाऱ्या कारमध्ये खामेनींची भेट; पण इराणच्या राष्ट्रपतींनाच शंकादरम्यान, केंद्र मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या म्हणण्यानुसार “आखाती देशांवर संकट असून तसेच होर्मूझच्या मार्गामध्ये अडथळे असून देशात LPG शॉर्टेज जाणवला नाही. कधी क्रूड शॉर्टेज जाणवला नाही. तसेच भारतातील पेट्रोल पंपही कधी कोरडे पडले नाहीत” असा सरकारचा दावा आहे. आधी भारत 27 देशांकडून क्रूड ऑइल आयात करत होता, आता 41 देशांकडून क्रूड ऑइल आयात करण्यात येत आहे.

