Headlines

ind vs ire team india lost against ireland but suryakumar yadav praises abhishek sharma; आयर्लंडविरुद्ध टीम इंडिया ढेपाळली, पण सूर्या दादाकडून एकाचं जाम भारी कौतुक; काय म्हणाला माजी कर्णधार?


Suryakumar Yadav praises Abhishek Sharma : आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामना भारताने गमावला. हा सामना भारतीय टीमकडून श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये खेळवला जात होता. दरम्यान, या पराभवानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने नेमकं काय म्हटलं आहे?

Surya kumar Yadav On Team India Lost Against Ireland
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हा भारतासाठी धक्का होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आयर्लंडने भारतावर तब्बल ३४ धावांनी वियज प्राप्त केला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर होता. त्याने टॉस जिंकला होता, त्यानंतर भारताने फिल्डिंगचा निर्णय घेतला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावांचे आव्हान भारताला दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने मात्र फक्त १४८ धावा केल्या आणि सर्व संघ बाद झाला. यासामन्यामध्ये गोलंदाजांसह भारताचे फलंदाजही काहीच प्रभावी खेळ करुन दाखवू शकले नाही.

भारताकडून फक्त अभिषेकचे अर्धशतक

भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्मा याने ५० धावा ठोकल्या. पण त्याच्याशिवाय एकाही इतर फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. शर्माने १९ बॉलमध्ये ७ चौकार आणि दोन षटकार लगावले, त्याने अर्धशतकीय खेळी केली. यासर्वावर आता भारताच्या टी-२० संघाच्या माजी कर्णधारानं म्हणजेच सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया दिली आहे. सूर्याने टी-२० वर्ल्डकप विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याची आयर्लंडविरुद्ध आणि त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी निवड झाली नाही मात्र त्याने अभिषेकच्या अर्धशतकावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्टेटस ठेवून अभिषेकचं कौतुक

त्याने अभिषेकचा फोटो स्टेटसला ठेवला आणि त्यावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘डिफरन्ट’, त्यामुळे सूर्याचे टीममध्ये कमबॅक कधी होईल माहिती नाही पण मात्र त्याच्या या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

Maharashtra TimesR Ashwin : सचिनच्या विक्रमाशी बरोबरी कशाला, त्याला सध्या सिनियर्सना पाणी पाजू द्या! आर अश्विन वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूबद्दल असं का म्हणाला?

पुढील सामना कधी?

दरम्यान, भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना उद्या (२८ जून) बेलफास्ट येथे रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर आता मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. क्रिकेट चाहत्यांना हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध वाहिन्यांवर थेट पाहता येईल. तसेच मोबाईल आणि अन्य डिजिटल माध्यमांवर सोनी लिव्ह अॅपद्वारेही सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा