Headlines

Income Tax Return Filing 2026; ITR फॉर्म भरताना घ्या दक्षता! एक चूक अन् हजारोंचा फटका; मग काय आहे योग्य प्रक्रिया? जाणून घ्या


जेव्हा विषय महसूलासंबंधित असतो त्यावेळी प्रत्येकजण अगदी जबाबदारीने गोष्टी हातळण्यावर प्रयत्न करतो. एखादी रक्कम कमवायला जीवाचे हाल करावे लागतात, त्यानंतर कुठे हातात कापलेली रक्कम येते. आयकर रिटर्न भरताना काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात कारण या प्रक्रियेदरम्यान घडणारी एक चूक आणि आपल्याला हजारोंचा फटका बसू शकतो. त्यामुळे आयटीआर भरताना योग्य फॉर्मची निवड करणे आवश्यक असते.

कधीकधी चुकीने किंवा योग्य प्रक्रिया माहीत नसल्यामुळे बहुतेकांकडून चुकीचा फॉर्म भरला जातो. मात्र आयटीआर भरण्यासाठी चुकीचा फॉर्म भरला जाण्याचे अनेक परिणाम असतात, जे टाळण्यासाठी आयकर विभागाकडून काही मुदतही दिली जाते. चुकीचा ITR फॉर्म भरल्यास आयकर विभागाकडून तुमच्या रिटर्नला डिफेक्टीव्ह रिटर्न म्हणून घोषित केले जाते.

Maharashtra Timesमुंबई-दिल्लीच्या रहिवाशांना दिलासा मिळणार; बेसिक सॅलरी, HRA घसघशीत वाढणार; पाहा 2.0, 2.1, 2.28 आणि 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण कॅलक्युलेशन

चुकीचा आयटीआर फॉर्म भरला तर काय होईल?

आयकर विवरणपत्र भरण्यासाठी चुकीचा फॉर्म भरला गेल्यास कलम 139(9) नुसार नोटीस पाठवली जाते आणि चूक दुरुस्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदतही दिली जाते. पण दिलेल्या मुदतीदरम्यानही काही सुधारणा केल्या गेल्या नाहीत तर भरण्यात आलेली आयकर रिटर्न अवैध, म्हणजे Void Return मानला जातो.

अशाप्रकारे एकंदरीत तुम्ही आयकर रिटर्न भरलाच नाही असे समजले जाते. अशा परिस्थितीत, तुमचा आयकर रिटर्न Void Return गणला जातो तेव्हा काही परिणामांना सामोरे जावे लागते.

सेक्शन 234एफ नुसार, आयकर रिटर्न दाखल करण्यास उशीर केला तर 5000 रुपयांपर्यंत दंड लागू शकतो. त्याचबरोबर मुख्यतः सेक्शन 234A, 234B आणि 234C नुसार, थकीत करावर व्याज भरावे लागू शकते. तसेच कर परतावा म्हणजेच Refund मिळण्यास उशीर होऊ शकतो.

Maharashtra TimesProperty Rules: पती, मुलबाळ नसलेल्या महिलेची संपत्ती कोणाला? वडिलांच्या संपत्तीत मुलीला वाटा, पण लेकीच्या मालमत्तेवर पालकांचे दुय्यम अधिकार

ITR भरताना Form निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

Income Tax Return साठी वेगवेगळे फॉर्म उपल्बध आहेत. योग्य फॉर्म निवडून पुढील प्रक्रिया करणे आवश्यक असते. अशावेळी आपण कोणत्या फॉर्मची निवड करावी? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. मुळात, भविष्यात येणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी योग्य फॉर्मची निवड करणे आवश्यक असते.

पगारदार नोकरदार वर्ग, तसेच मर्यादित मालमत्ता आणि एक घर असणाऱ्या करदात्यांनी ITR 1 फॉर्म भरायचा असतो. तसेच एखाद्या करदात्याकडे गुंतागुंतीचे कमाईचे स्रोत असल्यास किंवा करदाता स्वतः एखाद्या कंपनीचे संचालन करत असल्यास तसेच परदेशी मालमत्ता असल्यास करदात्याला आयटीआर-2 फॉर्मची निवड करावी लागते. स्वतःचा व्यवसाय किंवा व्यवसायातून येणारे उत्पन्न असणाऱ्या करदात्यासाठी ITR 3 फॉर्मची निवड करावी लागते तर, presumptive taxation असलेल्या व्यावसायिकांसाठी ITR 4 फॉर्म आहे.

जरी ITR 3 आणि ITR 4 हे व्यावसायिकांसाठी असले तरी त्यात फरक आहे. ITR 3 हा फॉर्म नियमित व्यावसायिकांसाठी तसेच प्रोफेशनलसाठी आहे. तर ITR 4 हा फॉर्म presumptive taxation scheme निवडणाऱ्यांसाठी आहे. ITR 3 फॉर्म निवडताना पूर्ण खातेपुस्तक ठेवावी लागतात तर ITR 4 फॉर्म निवडताना तपशीलवार खातेपुस्तकांची गरज कमी लागते. एकंदरीत, आयकर रिटर्न भरताना योग्य फॉर्म निवडल्यास संभाव्य परिणाम टाळता येतात. जरी चुकीने चुकीचा फॉर्म भरला गेला तरी त्याला सुधारण्यासाठी आयकर विभागाकडून 15 दिवसांची मुदत दिली जाते. त्या कार्यकाळात आपल्याला सुधार करावा लागतो अन्यथा अनेक परिणामांना सामोरे जावे लागते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत