Headlines

IMD Maharashtra Weather Forecast Pune Red Alert Mumbai less rainfall Winds from Arabian Sea active; पुणे घाट परिसराला रेड अलर्ट, मुंबईत जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज; अरबी समुद्रावरुन येणारे वारे अधिक सक्रिय


IMD Weather Alert : पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट माथ्याला ‘रेड ॲलर्ट’ देण्यात आला आहे.

Pune Rain Red Alert Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, तापमानात थोडी घट होणार आहे. दुपारनंतर शहर आणि जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट माथ्याला ‘रेड ॲलर्ट’ दिला आहे. पुण्यात मंगळवारी दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. रिपरिप पाऊस दिवसभर पडत राहिला. मुंबईतही दुपारी काही मिनिटे पडलेल्या सरींनी तुरळक ठिकाणी रस्ते जलमय झाले.

महामुंबईत आजही पावसाचा जोर

मुंबईमध्ये मंगळवारी दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाचा आणि वाऱ्याचाही जोर अधिक होता. दुपारच्या वेळी अवघ्या काही मिनिटे पडलेल्या सरींनी तुरळक ठिकाणी रस्तेही जलमय झाले. मुंबईत आज, बुधवारी पावसाचा जोर कमी होईल; वाऱ्याचा जोर मात्र कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईला मंगळवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ असतानाही दिवसभरात फारसा पाऊस झाला नाही. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत कुलाबा येथे ३.६, तर सांताक्रूझ येथे ६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुरळक ठिकाणी १० ते २० मिलीमीटरदरम्यान पाऊस नोंदला गेला. मात्र, वाऱ्यांचा वेग दिवसभरात अधून मधून अधिक होता. मुंबईत बुधवारीही वाऱ्यांचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे. यासोबतच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra TimesMarriage Without Divorce : तू उद्या मरणारेस, माझं काय? नवऱ्याला कॅन्सर होताच बायको सोडून गेली; घटस्फोटाविना दुसरा संसार; कोर्ट म्हणालं, अटक करा!
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही अधिक असू शकेल. देशभरात सध्या विविध हवामान प्रणाली सक्रिय आहेत. त्यामुळे राज्याच्या, तसेच देशाच्या विविध भागांमध्ये हवामान इशारे जारी करण्यात आले आहेत.

Dipake’s Mother | एखादा विद्यार्थ्याचा मृत्यू झाला की सरकार दखल घेईल, दिपकेंच्या आईचा आक्रोश

हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर आंध्र प्रदेशावर हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रावरून येणारे वारे अधिक सक्रिय आहेत, असे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. यामुळेच पुणे घाट परिसरालाही बुधवारसाठी ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे. हे वातावरण आषाढी एकादशीपर्यंत कायम राहील. त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकेल, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
Maharashtra TimesDharmendra Pradhan : CJP आंदोलनावर शिक्षणमंत्र्यांनी मौन सोडलं, ‘नीट’ पेपरफुटीवर संसदेत चर्चेस तयार, धर्मेंद्र प्रधान यांचं उत्तर

मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात उघडीप

‘मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंतच्या १० व मराठवाड्यातील आठ अशा १८ जिल्ह्यात रविवार, २६ ते ३१ जुलैपर्यंतच्या सहा दिवसांत काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते, असे ते म्हणाले. ‘बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व उत्तर प्रदेशकडे सरकण्याच्या शक्यतेतून अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनंतर पावसाचा जोर कमी होऊन मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप जाणवणार आहे’, असे खुळे यांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा