Headlines

Heavy rain alert in marathwada expecting significant rain with thunderstorms in 5 districts; पावसाची तूट असलेल्या मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ५ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह बरसण्याचा अंदाज


म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला असला, तरी इतर जिल्ह्यांत पावसाची तूट कायम आहे. विभागात आतापर्यंत केवळ १६६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. ‘एल निनो’ची तीव्रता वाढताच अनेक भागातून पाऊस गायब झाला आहे. मराठवाड्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तुरळक पावसाच्या सरींवर पिके तग धरून आहेत. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही पावसाची तीव्रता कमी असल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या २४ तासांत म्हणजेच, गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना ८.१, बीड ३.४, लातूर १.४, धाराशिव ०.६, नांदेड ०.६, परभणी १.८ आणि हिंगोली २.३ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. विभागात सरासरी तीन मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. येत्या २० जुलैपर्यंत हलक्या स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

कसा आहे पावसाचा अंदाज?

परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत १८ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज, १७ जुलैला दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाच्या शिडकाव्याने खरीप पिकांना तूर्तास जीवदान मिळाले आहे. मात्र, पिकांची वाढ खुंटली असून, सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

सरासरी ७२.४ टक्के पाऊसकापूस, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. विभागात ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, इतरत्र पेरणी करण्यासाठी पाऊस नसल्याचे चित्र आहे. विभागात आतापर्यंत २३० मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ १६६ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरी ७२.४ टक्के पाऊस झाला आहे.

खुलताबाद : शहर व परिसरामध्ये तब्बल दहा दिवसानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर गुरुवारी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळी हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत