Headlines

Gulabrao Patil Shiv Sena Jalgaon Leader talks on losing Mother in childhood not having her Photo; मी 6 महिन्यांचा असताना आई गेली, गल्लीतल्या बायका ती कशी दिसायची सांगायच्या, आयुष्यभर शोधूनही तिचा फोटो सापडला नाही, गुलाबराव पाटील यांची हळवी आठवण


Gulabrao Patil on Mother Photo : मी सहा महिन्यांचा होतो, तेव्हा माझी आई वारली. त्यावेळी फोटो काढण्याची पद्धत नसल्यामुळे आईचा फोटो खूप शोधूनही आयुष्यभर पाहता आला नाही. गल्लीतल्या महिला माझी आई कशी दिसायची, एवढ्याच आठवणी सांगायच्या, अशी हळवी आठवण मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली.

Gulabrao Patil Jalgaon Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : मी सहा महिन्यांचा असताना आईचं निधन झालं. नवव्या महिन्यापासून काकूने सांभाळ केला. आईचा फोटो आयुष्यभर शोधूनही मिळाला नाही, अशा शब्दात शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आयुष्यातील भावनिक आठवणी सांगितल्या. गल्लीतल्या महिला आई कशी दिसायची, एवढ्याच आठवणी सांगायच्या, ज्याला आई आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस, असे उद्गार पाटलांनी काढले. ते जळगावात बोलत होते.

विद्यार्थ्यांना ‘आई-बाबा म्हणा, मग साईबाबा म्हणा’ असा सल्ला देतानाच कितीही संपत्ती, शेती आणि पदे आली तरी गर्व करु नका, अशा सूचनाही गुलाबराव पाटील यांनी जळगावात समर्थक-कार्यकर्त्यांना केल्या.

गुलाबराव पाटलांना बालपणीच मातृशोक

मी सहा महिन्यांचा असताना माझी आई वारली. त्यावेळी फोटो काढण्याची पद्धत नसल्याने आईचा फोटो खूप शोधूनही आयुष्यभर मिळाला नाही. गल्लीतल्या महिला आई कशी दिसायची, एवढ्याच आठवणी सांगायच्या, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

काका पीएसआय, काकूने सांभाळलं

आईच्या निधनानंतर नऊ महिन्यांचा असल्यापासून काकूने सांभाळ केला. काका पीएसआय असल्याने त्यांच्या बदलीच्या ठिकाणीच माझे शिक्षण झाले. त्यामुळे मला गुर्जर भाषा येत नव्हती. शाळा संपल्यानंतर पाळधी येथे आल्यानंतर गुर्जर भाषा शिकलो, असे पाटील यांनी सांगितले.

Maharashtra TimesNashik Murder : पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात

पाडव्याच्या दिवशीची चटणी भाकर

आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना पाटील म्हणाले की, एकेकाळी पाडव्याच्या दिवशी आम्ही चटणी-भाकरी खाल्ली. ती आठवण आजही डोक्यातून निघालेली नाही आणि कधीही निघणार नाही. त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले, कितीही संपत्ती आली तरी जीवनातील कठीण दिवस विसरू नका आणि गर्व अंगाशी येऊ देऊ नका, असा संदेश गुलाबराव पाटील यांनी दिला.

मुलगा झेडपी शाळेत शिकला

आमदार असतानाही माझा मोठा मुलगा जिल्हा परिषद शाळेत शिकला. आयुष्यात अनेक कठीण दिवस पाहिले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, नातेवाईक आणि आपल्या माणसांना सांगतो की, शेती, संपत्ती आणि कितीही मोठी पदे मिळाली तरी कधीही गर्व करू नका, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Maharashtra TimesTwisha Sharma : बायकोचे अवशेष उद्या न्यायला सांग, आता मला शांततेत मरु दे; Ex मिस पुणेचा वहिनीला शेवटचा मेसेज, काही मिनिटात मृत्यूला मिठी

आधी आईबाबा, मग साईबाबा

यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना पाटील म्हणाले, ज्याला आई आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. त्यामुळे पहिले ‘आई-बाबा’ म्हणा आणि मग ‘साईबाबा’ म्हणा. आई-वडिलांचे महत्त्व ओळखा आणि आयुष्यात कितीही मोठे झालात तरी आपल्या संघर्षाच्या दिवसांना विसरू नका, असेही त्यांनी सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा