Headlines

gondia bus- truck accident three died 8 passenger in critically injured ; राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकवर ट्रॅव्हल्स धडकली, तिघांचा मृत्यू, 8 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक


Gondia Accident: भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या ट्रकवर धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू, तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत.

gondia accident
gondia accident(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स धडकल्याने भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर ४० प्रवासी जखमी आहे. त्यातील आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. देवरीनजीक धोबीसराळ येथे गुरुवार मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील जखमी व मृत हे छत्तीसगड कवर्धा, खैरागड येथील आहेत. हे सर्व प्रवासी मजूर असून कामासाठी चंद्रपूरकडे जात होते.

प्राप्त माहितीनुसार, देवरीपासून २ किमी अंतरावर असलेल्या धोबीसराळ या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर इंधन संपल्याने बंद अवस्थेत ट्रक क्रमांक सीजी ०४ एनटी ५०९६ उभा होता. कवर्धा छत्तीसगड येथून चंद्रपूर येथे दररोज जाणारी कांकेर ट्रॅव्हल्स बस क्रमांक सीजी १९ बीएल ८००१ ने उभ्या ट्रकला मध्यरात्री जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४० प्रवासी जखमी झाले. त्यात एक महिला सुनीता हेमलाल बघेले (वय ३५) रा. खैरागड हिचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी प्रवाशांवर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Maharashtra Timesक्रूर नियती! लग्न समारंभ उरकून घरी येताना काळाने घेरलं, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू
त्यापैकी ११ गंभीर जखमी प्रवाश्यांना गोंदिया शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्यापैकी दोन रुग्णांना नागपूरला उपचारासाठी नेताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. तर आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉ. येडे यांनी दिली आहे. या बसमध्ये ५०च्या वर प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra TimesNagpur Crime: नागपुरात डॉक्टर तरुणीने झोपेतच बॉयफ्रेंडला संपवलं, मग स्वत:वर वार करत भलताच बनाव रचला, पण…
सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत
अपघाताच्या आवाजामुळे धोबीसराळ गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले. पोलिसांना सूचना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. देवरी येथील हेल्पिंग ग्रुपच्या सदस्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यास मदत केली. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अमित येडे व डॉ. नेहा मुलार यांनी ४० जखमीवर उपचार केले. जिल्ह्यातील सर्व १०८ रुग्णवाहिकांना बोलावून ११ गंभीर जखमींना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविले. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड करीत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा