Headlines

Gold Silver Rate Today 27 july 2026; पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा परिणाम; सोने-चांदीची स्वस्ताई ओसरली, अमेरिका-इराण युद्ध थांबताच दर पुन्हा वाढले


Gold Price Today : जानेवारी 2026 मध्ये उच्चांकी शिखरावर झेप घेतलेल्या सोने-चांदीचे भाव गेल्या काही महिन्यांपासून वर-खाली होत आहेत. उच्चांकी मजल मारल्यानंतर गुंतवणूकदारांकडून होणारी नफा-वसुली तसेच, मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने सोन्या-चांदीच्या दरांवरील दबाव आणखी वाढला असून गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघेही संभ्रमात सापडले. यातच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली.

सोने आणि चांदीचे दर वर-खाली सुरूच

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत बरेच चढउतार दिसून आले असून आता सोमवार (27 जुलै), आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी, दोन्ही मौल्यवान धातूंच्या दर पुन्हा तेजीची उभारी घेऊ लागले आहेत. मागील आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाला विराम लागला ज्यामुळे सोमवारी बाजाराच्या सुरुवातीला क्रूडच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि त्यानंतर अमेरिकन डॉलर कमकुवत झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील या हालचालींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी, 27 जुलै, रोजी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वधारल्या.

Maharashtra TimesUS Economic Crisis: ट्रम्पची अमेरिका अनागोंदींच्या वाटेनं! GDP वर 3250 लाख कोटींचे कर्ज, भारतासह सर्व गुंतवणूकदारांना कियोसाकींनी सांगितला उपाय
सकाळी 9.15 वाजता देशांतर्गत बाजारात MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याचा वायदा 0.53 टक्के किंवा 750 रुपयांनी वाढून 1,43,860 रुपये झाला तर, चांदीचे फ्युचर्स 1.04% किंवा सुमारे 2300 रुपयांनी वाढले आणि 2,24,447 रुपये किलोवर उसळले. दुसरीकडे, डॉलर इंडेक्समध्ये 0.30% हून अधिक घट झाली, ज्यामुळे अमेरिकी चलनात मोजल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंची खरेदी परकीय चलनांत खरेदीदारांना अधिक परवडणारी झाली.

अमेरिका-इराण संघर्षात आशेचा किरण

तसेच अमेरिका-इराण यांच्यातील परिस्थितीत सामान्य होण्याच्या आशेपोटी दोन आठवड्यांच्या लक्ष्करी संघर्षानंतरआठवड्याच्या शेवटी लष्करी हल्ले थांबवल्यानंतर सोमवारी तेलाच्या किमतीत 5% घसरण झाली.

Maharashtra TimesLIC Pension Plan : रिटायरमेंटची चिंता सोडा! एलआयसी योजनेत एकदा गुंतवणूक करा अन् दरमहा 20000 मिळवण्याची हमी;‘स्मार्ट’ पॉलिसी आहे तरी काय?
याशिवाय मध्यपूर्वेतील सतत बदलणाऱ्या परिस्थितीचा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांवर स्पष्ट परिणाम दिसून येताना सोमवारी (27 जुलै) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 1% हून अधिक वाढ झाली. स्पॉट सोन्याचे दर सुमारे 1.3% वाढून $4,103.99 प्रति औंसवर पोहोचला तर, ऑगस्ट अमेरिकन सोन्याचे फ्युचर्स सुमारे 0.9% वाढले असून प्रति औंस $4,106.10 च्या आसपास व्यवहार करत आहेत.

Maharashtra Times8th Pay Commission: 18000 हजारांची बेसिक सॅलरी होणार 69000 रुपये? लवकरच होणार मोठा निर्णय; कधी येणार रिपोर्ट? जाणून घ्या टाइमलाइन
पश्चिम आशियातील संघर्षाला विराम लावण्याच्या उद्देशाने अमेरिका किंवा इराण यांच्याकडून राजनैतिक प्रयत्नांची कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नसली, तरी लष्करी हल्ल्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटी खंड पडल्यामुळे तोडग्याची आशा निर्माण झाली, ज्यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव निवळू शकेल आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून तेलाची वाहतूक पुन्हा सुरळीत होऊ शकेल.