Today’s Gold-Silver Prices 2nd July 2026: सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी-मंदीचा कल थांबायचं नाव घेत नाही आहे. जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (2 जुलै) सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. सोने आणि चांदीच्या दरांमध्ये विक्रमी उच्चांकांवर जोरदार तेजीनंतर मोठी घसरण अनुभवली आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.

सोने-चांदीत संमिश्र व्यवहार कल
गुरुवारी (2 जुलै) सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये संमिश्र कल दिसून आला. सकाळी 9:40 च्या सुमारास MCX वरील सोन्याचे ऑगस्ट महिन्याचे करार 0.13% घसरून प्रति 10 ग्रॅम 1,44,221 रुपयांवर व्यवहार करत होते, तर चांदीचे सप्टेंबर महिन्याचे करार 0.50% वाढीसह 2,29,356 रुपये किलोवर होते. जागतिक संकेत सकारात्मक असतानाही स्पॉट मार्केटमधील मागणीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी परस्परविरोधी दिशा घेतली.
Stock Market Crash: जागतिक बाजाराच्या उलट भारताची चाल; अमेरिका, कोरिया ते जापानपर्यंत मार्केट गारेगार, सेन्सेक्स-निफ्टीत बरसल्या तेजीच्या धारा
जागतिक बाजारात सोन्याची झळाळी परतली
याउलट, अमेरिकेच्या फेड रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ सुरूच राहिली. फेड अध्यक्षांच्या विधानानंतर महागाईला आळा घालण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून यावर्षी व्याजदर वाढवण्याची शक्यता कमी झाली. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, मागील सत्रात 0.6% वाढीसह बंद झाल्यानंतर, 2 दिवसांच्या घसरणीतून सावरत, जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.9% वाढ होऊन सुमारे $4,066 प्रति औंसवर पोहोचला.
8th Pay Commission लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट; 3 टक्के वाढणार DA, हातात किती येणार पगार?
तीन महिन्यांहून जास्त काळ चाललेल्या इराण युद्धामुळे ऊर्जा किमती वाढल्या आणि महागाईबद्दल चिंता वाढली असताना मध्यवर्ती बँकेच्या पुढील हालचालींबद्दल चिंता कमी करत फेड अध्यक्षांनी बुधवारी पोर्तुगालमधील युरोपियन सेंट्रल बँक फोरममध्ये अपेक्षेपेक्षा कमी कठोर भूमिका घेतली. जागतिक बाजारात सोने-चांदीची किंमत अनुक्रमे 8 महिने आणि 7 महिन्यांतील नीचांकी जवळ पोहोचवल्यावर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत खरेदी होताना दिसत आहे. डॉलरने 101.4 ची पातळी ओलांडून मजबूती दर्शवली त्यामुळे मौल्यवान धातूंवरील दबाव वाढलेला.
सोने-चांदीच्या गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम
सुरुवातीच्या काळात सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना 2025 आणि 2026 च्या सुरुवातीला बक्कळ परतावा मिळाला. 2025 मध्ये चांदीच्या दरात 170 टक्क्यांची वाढ झाली आणि जानेवारीत 4.54 लाख रुपयांचा उच्चांक गाठला. तसेच सोन्यानेही प्रति 10 ग्रॅम 2.04 लाख रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला, पण नंतर अचानक उलटफेर झाला.पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्याने अमेरिका-इस्रायल आणि इराणने क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यावर अनेकांना मौल्यवान धातूंची तेजी कायम राहील अशी अपेक्षा होती.
AI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली
मात्र, यावेळी अगदी उलट घडले. दर वाढण्याऐवजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांवर सुधारणेचा रंग चढला, ज्यामुळे उच्चांकी पातळीच्या आसपास गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, उच्चांकी पातळीवर गुंतवणूक करून अडकलेल्या गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे याबाबत निर्णय घेण्याआधी या विक्रमी पातळीवरून झालेली ही मोठी घसरण कशामुळे झाली, हे समजून घेणे फायदेशीर ठरेल.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

