होय, केंद्र सरकार आता तुमच्या-आमच्या तिजोरीत पडून राहिलेले सोन्यासाचे दागिने, नाणी बाहेर काढण्याचा प्लॅन करत आहे. अशाप्रकारे, सरकार सोन्याच्या रूपातील या निद्रिस्त ‘कुंभकरण’ला जागे करण्यात यशस्वी झाले, तर त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येऊ शकतो.
प्रत्येक वर्षी भारतात भरमसाठ सोन्याची आयात
भारत आपल्या गरजेपैकी दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशातून सोन्याची आयात करतो, ज्यासाठी डॉलरमध्ये किंमत मोजावी लागते. हेच सोने सर्वसामान्यांच्या तिजोरीत बचत म्हणून जमा होते आणि दरवर्षी असंच चक्र सुरू राहतं. त्यामुळे लोकांच्या घरात सोन्याचा डोंगर जमा होतो आणि केवळ बचत म्हणून घरात पडून राहते, त्याचा देशाला कोणताच फायदा होत नाही. या दरम्यान भारत अधिक सोने आयात करण्यासाठी डॉलर्स खर्च करत राहतो.
भारतीयांच्या तिजोरीतील सोने बाहेर काढणार सरकार
करोडो भारतीयांच्या घरात तब्बल 30,000 टन सोने पडून असल्याचा अंदाज असून त्यातून जनतेलाही कोणतंच उत्पन्न मिळत नाही. हेच हजारो टन सोने एका विशेष योजनेअंतर्गत बाजारात आणण्याची भारतीय सरकार तयारी करत आहे आणि सुवर्ण मुद्रीकरण योजनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी पहिल्यांदाच सराफांचा (सोने विक्रेत्यांचा) देखील समावेश केले जाणार असून या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देऊन ईटीने आपल्या अहवालात म्हटले.
भारतीय घरांमध्ये पडून असलेल्या सोन्याचा वापर करण्याच्या उद्देशाने असलेली नवीन योजना पुढील 2 महिन्यांत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच थेट फायदा होणार नाही, तर अर्थव्यवस्थेवरील आयातीचा दबावही कमी होऊ शकेल.
घरातील सोन्यावर व्याज मिळणार
या नव्या योजनेद्वारे सरकारने 1000 टन सोने जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीतील सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. पूर्वीच्या Gold Monetaisation योजनेअंतर्गत जनतेकडून सोने गोळा करण्याची जबाबदारी केवळ बँकांची होती, पण आता देशभरातील सराफ व्यावसायिकही या कामात हातभार लावतील. या योजनेअंतर्गत सराफ व्यावसायिक जनतेकडून सोने गोळा करून वितरण करेल.
EPFO New Rule Explained: 100000 मूळ पगार तरी 1800 रुपयेच PF कट होणार, असं का? छोटी बचत देईल 19 लाखांचा रिटायरमेंट फंड, जाणून घ्या नवा फॉर्म्युला
अलीकडील उद्योग अभ्यासांमध्ये उद्धृत केलेल्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार,
- भारतातील घरे आणि मंदिरांमध्ये अंदाजे 25000 टन सोन्याचा अंदाज आहे.
- इतर उद्योग अंदाजांनुसार 30000 टनांच्या जवळपास आहे.
- तर काही अभ्यासांनुसार घरे आणि मंदिरांमधील सोन्याचा साठा 50000 टनांपर्यंत पोहोचू शकतो.
भारतीयांच्या घरात 47 लाख कोटींचे सोने
सोन्याच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे गेल्या दोन वर्षांत या स्टॉकच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळाले आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार, जानेवारी 2026 पर्यंत भारतीयांच्या घरातील सोन्याची किंमत अंदाजे 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 4,77,610,750,00,000 रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे, जो जीडीपीच्या अंदाजे 125% आहे.
तसेच मॉर्गन स्टॅनलीने भारतीयांच्या घरातील पडून राहिलेल्या सोन्याची किंमत $3.8 ट्रिलियन असल्याचा अंदाज वर्तवला आहे, तर यूबीएसने $4.5 ट्रिलियनपर्यंत किंमत असल्याचा दावा केला आहे. म्हणजे, भारताकडील खाजगी सोन्याचा साठा जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांच्या एकत्रित सुवर्णसाठ्यापेक्षाही जास्त आहे, पण तरीही याचा अर्थव्यवस्थेला फायदा होत नाही किंवा त्यातून जनतेल कोणताही आर्थिक परतावा मिळत नाही.
काय आहे Gold Monetaisation योजना?
2015 मध्ये भारत सरकारने Gold Monetaisation योजना सुरू केलेली, ज्याचा उद्देश घरात किंवा लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्यातून उत्पन्न मिळवून देण्याचा होता. या गोल्ड मोनेटायजेशन योजनेअंतर्गत, जे लोक सोने जमा करतात, त्यांना बँक ठेव खात्यावर व्याज मिळवून देते.

