Headlines

Gold ETFs Net Inflows June 2026; भारतीयांनी Gold Crash चा पुरेपूर घेतला फायदा; 3,443 कोटींची खरेदी केली; जागतिक प्रवासाच्या विरुद्ध गेम फिरवला


Gold Demand : सोनं नेहमीच भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. सणासुदीचे दिवस असो वा लग्नसराईचा हंगाम, लोकं सोन्याच्या खरेदीसाठी कचरत नाही. तुम्ही-आम्हीच नाही तर, जगभरातील देश आणि मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात सोने खरेदीचा सपाटा लावला आहे.

अलीकडच्या दिवसात चीनमध्ये सोन्याची क्रेझ दिसून आली असून इथे मध्यवर्ती बँकेने 20 व्या महिन्यात मोठी सोने खरेदी करून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. याशिवाय पोलंड या लहान युरोपीय देशाने तब्बल 64 टन सोन्याची खरेदी केली, पण या उलट भारताने भारताने अतिशय शांतपणे डाव उलटला आणि सोन्याबाबत अनोखी रणनीती अवलंबली. जून महिन्यात एकीकडे जगात सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल सुरू असताना भारताने मात्र वेगाने खरेदी केली.

Maharashtra TimesPF Interest Credit: 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित

भारतात सोने खरेदीचा सपाटा

जून 2026 च्या आकडेवारीनुर भारताने गोल्ड ईटीएफमध्ये तब्बल 38.8 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली, तर दुसरीकडे जागतिक गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात सोन्याच्या ईटीएफमधील गुंतवणूक कमी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार जागतिक गुंतवणूकदारांनी जून महिन्यात गोल्ड ETF मधून 8.9 अब्ज डॉलर्सची विक्री केली असून उत्तर अमेरिकेतून सर्वाधिक 5.5 अब्ज डॉलर्सची विक्री झाली. त्याचवेळी, आशियाई बाजारांनी गोल्ड ईटीएफमधून 2.3 अब्ज डॉलर्स आणि युरोपीय देशांनी 818 दशलक्ष डॉलर्स किमतीचे गोल्ड ईटीएफ विकले.

Maharashtra TimesRBI Rate Hike: दरवाढीसाठी सज्ज व्हा! महागाईच्या सावटात गृहकर्जाचा EMI महागणार; RBI कडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता
भारताची 34430000000 रुपयांची ताबडतोड खरेदी

अशाप्रकारे, एकीकडे जगभरात सोन्याच्या विक्रीचा सपाटा लागला असताना भारताने जोमाने खरेदी केली. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीत पाच पटीने वाढ झाली असून या काळात 388 दशलक्ष डॉलर्स म्हणजे तब्बल 3,443.23 कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली. याआधी मे महिन्यात गोल्ड ETFs मधून 61 दशलक्ष डॉलर्सची विक्री केली गेली.

मोदी सरकारने परदेशातून सोन्याच्या आयातीवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर ईटीएफ गुंतवणुकीला वेग आला. त्याचवेळी, सोन्याच्या किमती वाढल्या आणि नफावसुलीमुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली असताना गुंतवणूकदारांनी जूनमध्ये सोन्यात पुन्हा गुंतवणूक सुरू केली.

आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 27 टक्क्यांनी घसरली आहे तर, या घसरणीकडे भारतीय गुंतवणूकदारांनी संधी म्हणून पाहिले, तर जागतिक गुंतवणूकदारांनी अनिश्चितता आणि वाढत्या व्याजदरांच्या भीतीमुळे सोन्यापासून दूर राहणे पसंत केले.

Maharashtra TimesIncome Tax Filing: अरे देवा! चुकीचा ITR भरला? काळजी करू नका, लगेच डिलीट होईल; Revised आयटीआरची कटकट मिटली, पाहा स्टेप्स

व्याजदर अन् डॉलरचा सोन्यावर परिणाम

अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह – कडून व्याजदर वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमती घसरणपंथीला आल्या आहेत. व्याजदर वाढण्याच्या भीतीमुळे जागतिक बाजारातील गुंतवणूक पोर्टफोलिओतील सोनं विकून पळ काढत आहेत तर याउलट भारतीय गुंतवणूकदारांनी संधीचा फायदा घेऊन सोन्यातील गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढवली. कमी किमतीत सोने खरेदी केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून यामुळे मध्य पूर्वेतील व्यापक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत