Gold-Silver Rates Today, July 29 On MCX: सोने आणि चांदीच्या बाजारात घसरणीचा कल आजही कायम राहिला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या- बैठकीपूर्वी चिंतातुर गुंतवणूकदारांनी नफावसूल करणे सुरू ठेवल्यामुळे देश-विदेशातील बाजारात घसरण झाली आहे, ज्यामध्ये व्याजदर वाढवले जाण्याची किंवा दीर्घ कालावधीसाठी वाढीव दरांवर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

सोने-चांदीच्या दरात संमिश्र व्यवहार
फेडरल रिझर्व्हच्या बैठकीआधी MCX वर सकाळच्या सत्रात 0.14 टक्के किंचित घसरून 1.41 लाख रुपयांवर स्थिर राहिले आहेत, तर चांदीचे फ्युचर्स 0.38% किंचित वाढीसह 2.16 लाख रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.1% घसरणीसह 4,021.87 डॉलर्सवर कमी झाले असताना अमेरिकन सोन्याचे वायदे 0.4% घसरून $4,021.70 वर खाली आले. यावरून गुंतवणूकदार सध्या मोठी गुंतवणूक करणे टाळत आहेत आणि फेडच्या निर्णयाची वाटपाहत असल्याचे स्पष्ट होते.
अमेरिकेतील फेड रिझर्व्हच्या निर्णयाकडे बाजाराची नजर
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा अवलंबला ज्यामुळे बुधवारी, 29 जुलै रोजी, सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसत आहे. फेडच्या निर्णयामुळे महागाई आणि सोन्याच्या किमतींची भविष्यातील दिशा निश्चित होऊ शकते, असा गुंतवणूकदारांचा समज आहे.
फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याज दरवाढीच्या भीतीमुळे सोन्याच्या किमती किंचित घट नोंदवली गेली आहे. बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर घसरल्या असताना जागतिक बाजारातील गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णय आणि निवेदनाची आतुरतेने वाट पाहत आहेत जेणेकरून भविष्यातील आर्थिक धोरणाबद्दल संकेत मिळू शकतील.
जून महिन्यातील महागाई आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमी आली, ज्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवेल अशी मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. पण, मध्य-पूर्वेतील अलीकडच्या वाढत्या तणावामुळे महागाई वाढण्याच्या वाढलेल्या चिंतेमुळे फेड सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोने-चांदीच्या दरातील चढउताराची कारणे
- मध्यपूर्वेत अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढला असून त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होत आहे.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढूल्या आहेत, पण तरीही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम राहिली आहे.
- यावेळी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर स्थिर ठेवेल अशी बाजाराला अपेक्षा आहे.
- मात्र, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे व्याजदर वाढण्याची भीतीकडेही दुर्लक्ष केले जात नाही.

