Gold and Silver Price Crash 30 June 2026: आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि सोने-चांदीच्या दरांमधील घसरणीचा कल एका महिन्यापासून सुरूच राहिला आहे. चांदीच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावरून निम्म्याहून अधिक घसरल्या, तर मंगळवारी सोन्याच्या दरात 1% हून अधिक घसरण झाली आणि सलग चौथ्या महिन्यातही किमतीत घट होण्याची चिन्हे कायम राहिली.

सोने-चांदीच्या दरात घसरण सुरूच
सोने आणि चांदीच्या किमतीवर अख्ख्या जून महिन्यात प्रचंड दबाव दिसून आला. एकीकडे सोन्याच्या दरांमध्ये स्वस्ताईचा नवीन धमाका झाला तर, चांदीची किंमत आता उच्चांकावरून निम्म्याने घसरली आहे. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांच्या मनात धडधड सुरू असून खरेदीदार मात्र सुखावल्याचं पाहायाला मिळत आहे.
Petrol-Diesel Rule Change: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती
मंगळवार, 30 जून 2026 रोजी जागतिक कमोडिटी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय घसरण नोंदवली गेली. पश्चिम आशियातील सतत परिस्थितीचा परिणाम शेअर बाजारापासून ते कमोडिटी बाजारापर्यंत सर्वच गोष्टींवर होत असून कमोडिटी बाजारात रोलर कोस्टरसारखी स्थिती अनुभवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोमेक्सवर सकाळी 7.35 वाजता सोन्याची किंमत 4000 डॉलर/प्रति औंसच्या खाली घसरली असताना चांदीचा भाव 60 डॉलरच्या खाली घसरला आहे. MCX वर सुद्धा चांदीचा भाव त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून जवळपास निम्म्याने घसरणीसह व्यवहार करत आहे. मंगळवारी सकाळी MCX वर सोन्याचा वायदा भाव 1.40 लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता तर चांदीच्या फ्युचर्स किमतीही 2.20 लाखांवर व्यवहारात करत आहेत.
पगारातून TDS कापला पण भरला नाही, आयकर विभागाने दिली 3.36 लाखांची नोटीस; मुंबईतील IT प्रोफेशनलसोबत काय घडलं?
उच्चांकावरून किती स्वस्त झालं सोने-चांदी?
29 जानेवारी 2026 रोजी देशांतर्गत कमोडिटी बाजारात 1.80 लाख 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचलेली आणि चांदीच्या किमतींनी 4.20 लाख रुपये किलोवर झेप घेतलेली. अशाप्रकारे, सोमवार सोन्याचा भाव 1,42,413 रुपयांवर क्लोज झाला तर, चांदीची किंमत 2.23 लाखांवर क्लोज झालेली.
सोन्यासाठी पुढील प्रमुख घटक कोणता?
सोन्यासाठी पुढचा प्रमुख घटक किंवा ट्रिगर अमेरिकेच्या आर्थिक कॅलेंडरमधून येऊ शकतो. ग्राहक आत्मविश्वास, ADP खाजगी वेतनपट, साप्ताहिक बेरोजगारीचे दावे आणि शुक्रवारच्या अत्यंत महत्त्वाच्या नॉनफार्म वेतनपट अहवालावर गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतील. या आकडेवारीवरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि फेड रिझर्व्हच्या धोरणात्मक दृष्टिकोनाबद्दल नवे संकेत मिळतील.
Cash At Home: घरात 100-200 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात; लोकांची सवय अचानक का बदलली? करोनाशी कनेक्शन
अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत आकडेवारी आल्यास डॉलरला मजबूत होईल ज्यामुळे सोन्यावरील दबाव वाढेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर कमजोर आकडेवारीमुळे धोरण शिथिलतेची शक्यता वाढेल ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळू शकतो.
सोन्या-चांदीत गुंतवणुकीची हीच का संधी?
अनेकदा घसरणीच्या वेळी निर्यातदार खरेदीचा सल्ला देतात पण, सध्या बाजारातील हालचाल झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थतीत तुम्हाला दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल तर सोने-चांदी चांगला पर्याय असू शकतो, पण सावधगिरीने खरेदी करून हुशारीने निर्णय घ्या. प्रत्येक घसरणीच्या वेळी तुम्ही थोडी खरेदी करू शकता. याशिवाय, लग्न किंवा इतर सणासुदीला कुटुंबांना सोने-चांदी खरेदी करणे आवश्यक ठरते.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला कोट्यवधी जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सोने-चांदीची खरेदी कमी केली. याउलट, जागतिक बाजारातील घसरण पाहून भारतीय कुटुंबांनी जुन्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढवली आहे.
(Disclaimer : सोन्या-चांदीमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या भरवशाच्या आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

