Headlines

Gen Z Employee Uses Companys Own Rules to Teach HR a Lesson Video Viral | फोन वापरल्यामुळे बोनस कापला, जेन झीनं कंपनीचेच नियम वापरून घेतला बदला, शेवटी बॉसलाच बसला फटका


Workplace Viral Story: जेन झी कर्मचाऱ्याने कंपनीने बनवलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत बॉसला चांगलाच धडा शिकवला. मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्याचा २ टक्के बोनस कापला जाईल, असा नियम कंपनीने तयार केला होता. पण शेवटी याच नियमांत स्वतः बॉस अडकला आणि आर्थिक नुकसान कंपनीलाच सहन करावं लागलं.

Gen Z Employee
(ai generated images)
आत्ताचा जमाना हा जेन झी पिढीचा आहे, असं म्हटलं जातं. कारण ही नवी पिढी अन्याय सहन करत नाही, तर थेट प्रत्युत्तर देते. ही मंडळी नियम तोडत नाहीत, तर कुठलाही नियम इतक्या काटेकोरपणे पाळतात की नियम बनवणाऱ्यांचीच पंचायत होते. असंच काहीसं एक प्रकरण समोर आलं आहे. एका कंपनीने कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती. कामाच्या वेळात जर तुम्ही मोबाईलचा वापर कराल, तर तुमच्या बोनसपैकी २ टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाईल. एका तरुणाने पाच वेळा मोबाईलचा वापर केला. त्यामुळे नियमाप्रमाणे HR ने त्याला २ टक्के बोनस कपातीचा ई-मेल पाठवला. आणि हीच गोष्ट पुढे कंपनीला महागात पडली. त्या तरुणाने असा काही बदला घेतला की, यापुढे नियम बनवताना ती कंपनी किमान दहा वेळा विचार करेल.

नेमकं घडलं तरी काय?

नेमकं घडलं तरी काय?

हा व्हिडिओ appurv20 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांनी ऑफिसमधील वाय-फाय तांत्रिक कारणामुळे बंद पडलं. त्याच वेळी महत्त्वाची मिटिंग सुरू होती. दरम्यान बॉसनं याच जेन झी कर्मचाऱ्याला मोबाईलचं हॉटस्पॉट सुरू करायला सांगितलं. त्यानेही शांतपणे हॉटस्पॉट सुरू केलं. मात्र, त्याचवेळी त्याने HR ला ई-मेल पाठवून कळवलं की, त्याने ऑफिसच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल आणि वैयक्तिक इंटरनेट वापरलं आहे. त्यामुळे त्यासाठी रिइम्बर्समेंट द्यावी.

मात्र, HR ने त्याची मागणी नाकारली. कंपनीच्या नियमांनुसार वैयक्तिक इंटरनेट वापरासाठी रिइम्बर्समेंट मिळत नसल्याचं सांगण्यात आलं. हा ई-मेल वाचताच त्या तरुणाने तात्काळ हॉटस्पॉट बंद केलं. परिणामी मिटिंग थांबली आणि कंपनीचं काम खोळंबलं.
(फोटो सौजन्य – cottonbro studio/pexels.com)

कर्मचाऱ्याने असा घेतला बदला

​ ​

या प्रकरणानंतर HR ने त्या कर्मचाऱ्याला विचारलं, “थोडा वेळ हॉटस्पॉट दिलं असतं तर काय बिघडलं असतं?” यावर त्या जेन झी कर्मचाऱ्याने उत्तर दिलं, “कंपनीसाठी मी माझा २ टक्के बोनस का गमावू?” हे उत्तर ऐकल्यानंतर HR ला स्वतःची चूक लक्षात आली. या संपूर्ण प्रकरणात त्या कर्मचाऱ्याने कुठलाही नियम मोडला नाही किंवा कोणाशी उद्धटपणे वागलाही नाही. त्याने फक्त कंपनीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं आणि त्याच नियमांमुळे कंपनीला आर्थिक फटका बसला.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा