Headlines

France Heatwave 2026: फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर! 1000हून अधिक नागरिकांनी गमावला जीव; विक्रमी उच्च तापमानाची नोंद


France Heatwave 2026: आरोग्य संस्थेच्या प्राथमिक अंदाजानुसार, केवळ या तीन दिवसांतच किमान एक हजार अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. घरांमध्ये झालेल्या मृत्यूंची पूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

१
युरोप(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, बर्लिन: युरोपमध्ये सध्या आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने अनेक देशांमधील तापमानाचे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आलेल्या या ऐतिहासिक उष्णतेच्या लाटेदरम्यान देशात सुमारे एक हजारहून अधिक अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे, युरोपमधील इतर देशांनाही या तीव्र उष्णतेचा फटका बसत असून, जर्मनीत यामुळे जंगलांना भीषण आगी लागल्या आहेत, तर बर्लिनमध्ये गर्दीला शांत आणि थंड करण्यासाठी पोलिसांना चक्क वॉटर कॅननचा वापर करावा लागला आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या ‘वर्ल्ड वेदर अट्रिब्युशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, हवामान बदलाशिवाय युरोपमधील ही विक्रमी उष्णता आणि आर्द्रता निर्माण होणे निव्वळ अशक्य होते. पाच दशकांपूर्वी अशी उष्णतेची लाट येणे अशक्यप्राय गोष्ट होती, मात्र आज २० वर्षांपूर्वीच्या तुलनेत अशी लाट येण्याची शक्यता २०० पटीने वाढली आहे.

Maharashtra TimesGaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा
फ्रान्समध्ये भीषण परिस्थिती; मृतांमध्ये ६५ वर्षांवरील वृद्धांची संख्या जास्तफ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने सांगितले, की उष्णतेच्या लाटेच्या सर्वोच्च बिंदूवर असताना, विशेषतः पॅरिस परिसरातील घरांतून वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या फोन कॉलमध्ये प्रचंड वाढ झाली होती. फ्रान्समध्ये जेव्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली, त्या बुधवारी १,२०० हून अधिक मृत्यू झाले. त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत हा आकडा दररोज १,४००च्या पार गेला. उष्णतेच्या लाटेपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात फ्रान्समध्ये दररोज सरासरी ९०० ते एक हजार मृत्यू होत असत.

तीव्र उष्णतेचा रेड ॲलर्ट जारी केलेल्या भागांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. धक्कादायक बाब म्हणजे, एकूण मृतकांमध्ये ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे.

सुविधा कोलमडल्या

बर्लिनमध्ये शनिवारी उष्णतेशी संबंधित आजारांमुळे अचानक रुग्णवाहिकांच्या फेऱ्यांमध्ये ५०० ने वाढ झाली. या कडक उन्हापासून नागरिक आणि पर्यटकांना दिलासा देण्यासाठी बर्लिन पोलिसांनी एक अनोखा मार्ग शोधला. आंदोलकांना पांगवण्यासाठी वापरले जाणारे दोन मोठे वॉटर कॅनन पोलिसांनी ब्रँडेनबर्ग गेटसमोर उभे केले आणि तिथल्या गर्दीवर थंड पाण्याचा फवारा उडवला.

Maharashtra TimesPM Modi: PM मोदींनी घेतली 194 वर्षांच्या ‘जोनाथन’ची भेट; सेशेल्स दौरा चर्चेत
जंगलांना वणवे लागण्याचा धोका
या तीव्र उष्णतेचा फटका जर्मनीच्या दळणवळण व्यवस्थेलाही बसला आहे. अनेक महामार्गांवरील काँक्रीटचे रस्ते उन्हाने तडकले आहेत. लाइपझिश शहरात डांबर आणि काँक्रीट वितळल्याने ट्रॅकचे नुकसान झाले असून, सोमवार सकाळपर्यंत ट्राम सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आग्नेय युरोपमधील ग्रीसमध्ये नागरी संरक्षण संस्थेने पाच क्षेत्रांमध्ये जंगलांना वणवे लागण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. उत्तर युरोपमधील डेन्मार्कमध्ये शनिवारी तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेल्यानंतर रविवारी तिथे ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळ झाले. रविवारी सकाळपर्यंत देशभरात १,१५६ वेळा विजा कोसळल्याची नोंद झाली.

अत्यंत धोकादायक
उष्णतेची लाट युरोपच्या पूर्व भागाकडे सरकल्याने रविवारी जर्मनीच्या कुबशुट्झ भागात रात्रीच्या किमान तापमानाचा २९.४ अंश सेल्सिअस हा नवा विक्रम नोंदवला गेला. याच्या काही तास आधीच म्यॉकर्न-ड्रिविट्झ येथे दिवसाचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तीव्र उष्णतेमुळे पूर्व जर्मनीतील गोहरिशहाइडे येथील मोठ्या जंगलाला वणवा लागला. हे जंगल दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत दारूगोळ्याने दूषित असल्याने, तिथे लागलेली आग नियंत्रणात आणणे अग्निशामक दलासाठी अत्यंत धोकादायक बनले आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा