Fake birth and death certificate racket busted in Nandurbar cyber cafe: नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी सही ; 7 वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश
Fake birth and death certificate racket busted in Nandurbar cyber cafe: नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांची खोटी सही ; 7 वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश
नंदुरबारमध्ये एका सायबर कॅफेमधून बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे बनवल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून…
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नंदुरबार, महेश पाटील: सध्या देशात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले आहे. डिजिटल युगात गुन्हेगारांनीही त्यांची डोकी चालवून कमाई करण्याचे कामे सुरु केलेली आहेत. असाच काहीसा प्रकार आता नंदुरबारमध्ये समोर आला आहे. नंदुरबार शहरात गेल्या सात वर्षापासून एका सायबर कॅफेमध्ये बनावट शिक्यांच्या बनवून बोगस मृत्यू प्रमाणपत्राच बनवण्यात येत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात असलेल्या आ. के.ऑनलाइन सायबर कॅफेत हा प्रकार घडला. अनिल यशवंत कोळी ( रा. अमळथे, ता. नंदुरबार) व रिजवान सुभान खान ( रा. मुजावर मोहल्ला, नंदुरबार यांनी संगनमत करून गेल्या सात वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट जन्म नोंदी तयार केल्या. यासाठी त्यांनी जुन्या व जीर्ण रजिस्टर तसेच गहाळ रजिस्टरमधून मधील नोंद क्रमांकांचा गैरवापर करून प्रत्यक्षात जन्म नोंद नसतानाही बनावट नोंदी तयार करीत होते.
तयार केलेली बनावट जन्म प्रमाणपत्रे रिजवान याच्या मोबाईलवर पाठवून त्यांचा वापर इतर शासकीय दस्तऐवज काढण्यासाठी केला जात असल्याचेही समोर आले आहे.
तसेच पालिकेचा व पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाचे बनावट शिक्यांच्या वापर करून बनावट जन्म मृत्यू दाखला देत होते. या प्रकारामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी युवराज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अनिल यशवंत कोळी व रिजवान सुभान खान या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले हे करीत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना 9 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी पोलिसांनी पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा