Headlines

Eknath Shinde Descharged उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिस्चार्ज; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला


ठाणे, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सोमवारी सायंकाळी ठाण्यातील ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर आणि सर्व वैद्यकीय अहवाल समाधानकारक आल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शिंदे यांना ताप आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप कायम असल्याने तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान करण्यात आलेल्या रक्त तपासणीसह सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सामान्य आल्याचे समोर आले आहे.

शनिवारी सायंकाळी त्यांचा ताप उतरला होता, तर त्यानंतर प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत होती. मात्र, थकवा अद्याप जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाही शिंदे यांनी रविवारी आपल्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेत आवश्यक सूचना दिल्या. प्रकृती अस्वास्थ्यातही प्रशासनाच्या कामावर लक्ष ठेवत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत