Headlines

E20 Petrol Quality Controversy; इथेनॉल मिश्रित पेट्रोल एकदम सुरक्षित, वाहनांना धोका नाही! E20 इंधनात भेसळीच्या अफवांवर तेल कंपन्यांचे स्पष्टीकरण


E20 Fuel: अलीकडेच इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलची मोहीम लाँच केली. विरोधी पक्ष तसेच काही वाहन चालकांकडून या मोहिमेविरुद्ध प्रतिक्रिया समोर आल्या असताना ई20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने आता स्पष्टीकरण जारी केले आहे.

E20 पेट्रोल विवादावर सरकारचे स्पष्टीकरण

ई20 पेट्रोलमध्ये क्लोराईड नावाचे रसायन मिसळले जात असल्याचा गेल्या काही दिवसांपासून दावा सोशल मीडियात व्हायरल होत होता. यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आणि चर्चेने इतके जोर पकडले की सरकारी तेल कंपन्यांना स्पष्टीकरण देण्यास भाग पडले. ही अटकळ समोर आल्यानंतर अनेक पेट्रोल पंपांची तपासणी केल्याचे तेल कंपन्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Timesभारतावर 100% टॅरिफला अमेरिकन खासदारांचाच विरोध; अमेरिकेला कसं परवडणार नाही याचं गणित मांडलंसरकारी तेल कंपन्या – हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन – यांनी ई20 पेट्रोलमधील पाण्याची भेसळ आणि क्लोराईडच्या उच्च प्रमाणाच्या आरोपांची चौकशी केल्याचे स्पष्ट केले. या चौकशीत आतापर्यंत कोणतीही अनियमितता आढळलेली नाही आणि संपूर्ण पुरवठा साखळीतील इंधनाचा दर्जा विहित मर्यादेत असल्याचे म्हटले.

तेल कंपन्यांनी सांगितले की, सरकारने पेट्रोल मिश्रणात वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराईडचे कठोर निकष निश्चित केले, ज्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी रिफायनरी, डिस्टिलरी, डेपो, टर्मिनल आणि किरकोळ विक्री केंद्रांवर उच्च-वारंवारता देखरेख सुरू केली आहे.

Maharashtra TimesGold Silver Price Hike: सराफा बाजारात दरवाढीचा धडाका; सोन्याचा भाव 1.50 लाखांच्या पार, तर चांदीतही मोठी वाढ! सणासुदीत खरेदीदारांच्या खिशाला कात्रीयाशिवाय या तीन सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल इंधन गुणवत्ता टेस्टिंग लॅबदेखील तैनात केल्या आहेत. तसेच गुणवत्ता हमीचे सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी मान्यताप्राप्त इंधन प्रयोगशाळांमार्फत चाचणी निकालांची स्वतंत्रपणे पडताळणी केली जात आहे.

कुठूनकुठून नमुने घेतले

सरकारी तेल कंपन्यांनी सांगितले की रिफायनरींच्या 100 हून अधिक पेट्रोलच्या नमुन्यांमध्ये क्लोराईडची पातळी 1 पार्ट पर मिलियन (ppm) किंवा त्याहून कमी होती, तर गेल्या 10 दिवसांत तपासलेल्या 80 डिस्टिलरींमधील इथेनॉल नमुन्यांमध्ये 3 ppm पेक्षा कमी क्लोराईड असल्याचे आढळले.

याशिवाय, डेपो आणि टर्मिनल्समधून घेतलेल्या 80 हून अधिक नमुन्यांमध्येही 3 पीपीएमपेक्षा क्लोराईड कमी असल्याचे समोर आले असून किरकोळ विक्रीच्या पातळीवर गेल्या काही दिवसांत गोळा केलेल्या 160 हून अधिक E20 नमुन्यांमध्ये क्लोराईडची पातळी, शेकडो पीपीएमच्या दाव्याच्या उलट, 0-3 पीपीएमच्या दरम्यान नोंदवली गेल्याचे कंपन्यांनी पुढे सांगितले. अशाप्रकारे, तेल कंपन्यांनी सगळे दावे खोटे असल्याचे ठरवले.

Maharashtra TimesEthanol: पेट्रोल की घाणेरडं पाणी? अखेर समोर आली खरी कहाणी; E20 मुळे ग्राहकांपाठोपाठ पंप मालकदेखील अडचणीत

E20 बाबत अट्कळांचा बाजार गरम

पेट्रोलमध्ये सुमारे 500 मिलिग्रॅम क्लोराईड मिसळले जात असल्याचा दावा समोर आला होता पण, तपासणीतवास्तविक प्रमाण 0 ते 3 मिलिग्रॅम दरम्यान असल्याचे आढळले.

त्याचप्रमाणे, कंपन्यांनी सांगितले की सुमारे 9000 किरकोळ विक्री केंद्रांमधील भूमिगत साठवण टाक्यांची तपासणी सुरू असून दिवसातून 8 ते 12 वेळा ही तपासणी केली जात असून साठवण टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचा कोणताही पुरावा अद्याप आढळलेला नसल्याचेही स्पष्ट केले.

सार्वजनिक आणि शासकीय पातळीवर पोहोचला मुद्दा

E20 पेट्रोलमध्ये क्लोराईड आणि पाणी मिसळले जात असल्याचे अटकळ सुरू झाल्यापासून सर्वसामान्य जनता आणि सरकार या सर्वांमध्ये चिंता वाढली. इंधनामध्ये पाणी आणि क्लोराईड मिसळणे वाहनांसाठी हानिकारक असल्यामुळे इंधन पंप आणि इंजिनचे भाग गंजू शकतात, याच कारणामुळे सरकारने मुद्दा गांभीर्याने घेतला असून थेट चौकशी सुरू केली.