Trump Income India Connection: दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्याच्या एका वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा पैसा कमावला आहे. अलीकडेच ट्रम्प यांच्या कमाईचे एका वर्षातील आकडे जाहीर झाले, ज्यामध्ये 2025 मध्ये विविध मीडिया कंपन्यांसोबत करारांमधून जवळपास 8 अब्ज डॉलर्सची कमाई केल्याचे समोर आले आहे. तसेच इतर देशांमधील रिअल इस्टेट विकासकांना आपल्या नावाचा परवाना देऊन डॉलर्स कमावले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ फायदेशीर ठरल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. आकडेवारीनुसार, ट्रम्प यांच्या गेल्या एका वर्षातील उत्पन्नाचा मोठा हिस्सा दिल्ली, पुणे आणि गुरुग्रामसह अनेक शहरांमधून आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2025 मध्ये भारतातील व्यवसाय गुंतवणूक आणि रिअल इस्टेट परवाना करारांमधू $8.5 दशलक्ष म्हणजे अंदाजे 80.90 कोटी रुपये कमावले. ट्रम्प ऑर्गनायझेशनने स्थावर मालमत्ता परवाना करारांमधून महसूल मिळवला असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय स्थावर मालमत्ता परवाना व्यवसायासाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
सोसायटी मेंटेनन्स थकबाकीवर 12% दंड, सुलभ स्वयं-पुनर्विकास; सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजात होणारे बदल समजून घ्या
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वर्षात किती कमवले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वर्षात 2.3 अब्ज डॉलर्स कमावले, त्यापैकी त्यांच्या कुटुंबाने परवाना शुल्कातून 58 दशलक्ष डॉलर्स कमावले. या करारांनुसार विकासक केवळ शुल्क भरतात आणि आलिशान निवासी व व्यावसायिक प्रकल्पांवर ट्रम्प यांच्या नावाचा वापर करतात. भारतातील अनेक शहरांसह अनेक देशांमध्ये या करारांअंतर्गत प्रकल्प (ट्रम्प टॉवर) अस्तित्वात आहेत.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत इकॉनॉमी’ म्हणून संबोधले, पण आता अलीकडच्या कमाईच्या आकडेवारीने ट्रम्प यांचा दावा पुन्हा एकदा खोडून काढला आहे.
गुरुग्राममधून सर्वाधिक कमाई
ET नाऊच्या अहवालानुसार ट्रम्प कुटुंबाने एकूण उत्पन्नापैकी 10 दशलक्ष डॉलर्स केवळ भारतातील सहा शहरांमधून कमावले आहेत. गुरुग्राममधून ट्रम्प यांना सर्वाधिक महसूल मिळाल्याचे अहवालातून समोर आले असून ट्रम्प ऑर्गनायझेशनला एकट्या गुरुग्राममधून 5.4 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 51.3 कोटी रुपये) मिळाले. एम3एम ग्रुप आणि ट्रायबेका डेव्हलपर्सच्या भागीदारीत विकसित केलेल्या ट्रम्प-ब्रँडेड आलिशान निवासी प्रकल्पांमधून सर्वाधिक परवाना शुल्क मिळाले. डीटी मार्क्स गुरुग्राम 69 LLC आणि डीटी मार्क्स गुरुग्राम एलएल यांनी 3.64 दशलक्ष डॉलर्स कमावले.
Gold Rate Today: घसरत्या सोन्याच्या दराला मोठा ब्रेकडाऊन, किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ; चांदीच्या किमतीत जोरदार तेजी, आजचा भाव काय?
पण ट्रम्प यांचा व्यवसाय केवळ गुरुग्रामपुरता मर्यादेत नाही. मुंबई, हैदराबाद, नोएडा, पुणे आणि कोलकाता येथील अनेक ट्रम्प-ब्रँडेड प्रकल्पांमधूनही त्यांना भरीव पैसा मिळाला आहे. नोएडातील ट्रम्प प्रकल्पातून त्यांना परवाना शुल्कापोटी अंदाजे 1.5 दशलक्ष डॉलर्स, पुण्यातील ट्रम्प-ब्रँडेड ऑफिस प्रकल्पातून अंदाजे 1.5 दशलक्ष डॉलर्स आणि हैदराबादमधील ट्रम्प प्रकल्पातून अंदाजे 1.5 दशलक्ष डॉलर्स मिळाले. तसेच मुंबईतील वरळी येथील लोढा ग्रुपने विकसित केलेल्या ट्रम्प टॉवर प्रकल्पातून ट्रम्प यांना 1.80 लाख डॉलर्सपेक्षा जास्त परवाना शुल्कही मिळाले.
Indira Nooyi: अमेरिका, चीनचे कौतुक भारत अस्वच्छ, भारतात असते तर सीईओ झाले नसते! इंदिरा नूई यांच्या विधानामुळे नवा वाद
भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या आलिशान घरे आणि उच्चभ्रू स्थावर मालमत्तेच्या मागणीमुळे ट्रम्प ब्रँडला मजबूत बाजारपेठ मिळाली आहे. भारतातून ट्रम्प यांना केवळ छोटा हिस्सा मिळतो तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मध्यपूर्वेतून सर्वाधिक कमाई करतात. त्यांना दुबईतून 11.7 दशलक्ष डॉलर्स, अबू धाबीतून 10 दशलक्ष डॉलर्स, सौदी अरेबियातून 9.2 दशलक्ष डॉलर्स आणि दोहातून 5.25 दशलक्ष डॉलर्स मिळाले असून परवाना करारांद्वारे व्हिएतनाम, रोमानिया, तुर्की आणि इंडोनेशियामधूनही त्यांना पैसा मिळतो.

