Headlines

Dilip Joshi Missed Disha Vakani On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 18 Anniversary ; TMKOC Anniversary : काहीतरी चमत्कार होईल अन् दिशा परत येईल, तिच्याशिवाय मजा नाही! दयाबेनच्या आठवणीत जेठालाल भावुक, तारक मेहताला 18 वर्ष पूर्ण


Jethalal Missed Dayaben : नुकतीच तारक मेहता का उल्टा चश्मा या शोला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त दिलीप जोशी म्हणजेच दिलीप जोशी यानी दयाबेनची आठवण काढली अन् ती पुन्हा शोमध्ये परतावी अशी इच्छा व्यक्त केली.

daya jethalal
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नुकतीच सुपरहिट शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ 18 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्त खास कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या शोमध्ये जेठालाल आणि दया ही महत्वाची पात्र आहेत. दयाबेनला ही मालिका सोडून 9 वर्षे उलटली मात्र तरीही तिची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनातूनही किंचितही कमी झालेली नाही. मालिकेत एकत्र काम करताना सहवासानेही उत्तम मैत्री होते. तसेच काहीसे जेठालाल आणि दया म्हणजेच दिलीप जोशी आणि दिशा वखाणी यांचे होते.

दिशाने हा शो सोडला असला, तरी तिची उणीव केवळ प्रेक्षकांनाच नाही तर तिच्या सह-कलाकारांनाही प्रकर्षाने जाणवते. प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीप जोशी यांनी कबूल केले की, दिशासोबत स्क्रीन शेअर करण्याची आठवण त्यांना सतत येत असते. शोला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आशा व्यक्त केली की, “काहीतरी चमत्कार होईल आणि दिशा शोमध्ये परत येईल.”

Maharashtra TimesNitish Bhardwaj On Ramayana : टीव्हीवरील श्रीकृष्ण रणबीर कपूरचा श्रीरामपाहून भारावला! 100 % ऑस्कर मिळणार, पण ॲनिमलसारखे सिनेमे न करण्याचा सल्ला
दिलीप म्हणाले, “स्वाभाविकच, मी आणि दिशा गेल्या 10 वर्षांपासून या शोद्वारे जोडले गेलो होतो. आम्ही एकत्र किती अप्रतिम सीन्स साकारले होते, हे लोकांना माहित आहे. त्यामुळे, आम्हाला ती केमिस्ट्री आणि ते सीन्स नक्कीच आठवतात.” अभिनेत्याने असेही नमूद केले की निर्माते असित मोदी जेठालाल आणि दयाबेन यांची ती जादू पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले, “असित जी मला सांगत होते की त्यांनाही घरात शूट केलेली ते सीन्स आठवतात. असे सीन्स पुन्हा कसे आणता येतील, याचा ते सतत विचार करत असतात. त्यांच्याकडे कल्पना आहेत, पण पटकथेमध्ये त्या गोष्टी जुळून येत नाहीत.”

Maharashtra TimesSarika Navathe : अवंतिकाच्या सेटवर गावरान भाषेमुळे हसायचे लोक, सारिका नवाथेने ट्रिक शोधून केलेली बोलती बंद
ते पुढे म्हणाले, “एक अभिनेता म्हणून, दिशा ज्या दर्जाचे काम करायची, त्याची मला नक्कीच आठवण येते.” दरम्यान, अभिनेत्री मुनमुन दत्ताने प्रसारमाध्यमांना सांगितले की, तिने शोमधील इतर महिलांकडे कधीही स्पर्धक म्हणून पाहिले नाही. ती म्हणाली, “मी एक अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र स्त्री आहे. माझा विश्वास आहे की पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रगती केली पाहिजे. मला इथे कोणाबद्दलही कधीच असुरक्षित वाटले नाही.”


त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या महिला सहकाऱ्यांचा विशेष उल्लेख केला; गोकुळधाम सोसायटीमधील महिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचे कौतुक करताना तिने त्यांना “हुशार,” “बुद्धिमान” आणि त्यांच्यासोबत काम करणे “कमाल” असल्याचे म्हटले. ती म्हणाली, “या कमाल महिलांसोबत काम करायला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आमचे नाते खूप छान आहे आणि त्या सर्वजणी अप्रतिम आहेत असे मला वाटते.”

मुनमुनने असेही नमूद केले की, एखाद्या शोच्या यशात महिला कलाकारांची भूमिका तितकीच महत्त्वाची असूनही त्यांना अनेकदा योग्य ती ओळख किंवा मान मिळत नाही. “कधीकधी महिलांना त्यांना मिळायला हवे तितके महत्त्व मिळत नाही. मी असे म्हणत नाहीये की इथेही असेच घडते, पण काही ठिकाणी नक्कीच असे घडते. आम्ही शो आणि आमच्या पात्रांमध्ये मोलाची भर घालतो; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील महिला कलाकारही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”