Headlines

Dharashiv Tuljabhawani Temple Sanstha 48 Crores Cash Deposited in Treasury use for Convenience of Devotees; तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च


Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानची आर्थिक स्थिती मजबूत असून, उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा देवीचरणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सेायी-सुविधांवर आणि धार्मिक; तसेच सामाजिक कार्यावर खर्च केला जात असल्याचे आर्थिक विवरणपत्रकावरून स्पष्ट होत आहे.

Tuljabhawani Temple Sanstha
तुळजाभवानी मंदिर तिजोरी ४८ कोटी रोकड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत गेल्या वर्षभरात तब्बल ४८ कोटी ७१ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न जमा झाले आहे. मागील आर्थिक वर्षात मंदिर संस्थानला एकूण महसूली खर्च वगळता तब्बल पावणेसहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वर्षभरात देशभरातील भाविकांनी तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत दहा किलो सोने आणि २६७ किलो चांदी अर्पण केली आहे.

मंदिर संस्थानला तब्बल कोटींचा नफा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा अर्थात महसुली अहवाल जाहीर करण्यात आला आहे. मंदिर संस्थानला मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा नफा झाला असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात विविध माध्यमांतून मंदिर संस्थानला तब्बल ४७ कोटी ५७ लाख ४४ हजार ८०३ रुपये एवढी रोकड भाविकांनी अर्पण केली आहे, तर संस्थानने वेगवेगळ्या साहित्यांच्या विक्रीतून एक कोटी १३ लाख रुपयांचे रोख उत्पन्न प्राप्त केले आहे.
Maharashtra TimesMumbai BEST Bus: ‘बेस्ट’ची कोंडी फोडण्यासाठी नवे नियोजन, दादरमधील बसचे मार्ग बदलणार; प्रवाशांना फटका बसणार
मंदिर समितीला मागील वर्षभरात एकूण ४८ कोटी ७१ लाख ३२ हजार ४४ इतकी रोकड प्राप्त झाली आहे. मागील वर्षभरात जमा आणि महसुली खर्च याचा ताळमेळ पूर्ण झाल्यानंतर मंदिर समितीला तब्बल पावणेसहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. मंदिर संस्थानच्या अधिकृत आर्थिक विवरणपत्रकातून ही माहिती समोर आली आहे. मंदिराला मिळालेल्या रोख स्वरूपातील उत्पन्नातून भक्तांच्या सोयी-सुविधा आणि इतर विकासकामांवर ४२ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयी-सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देऊन मंदिर प्रशासनाने सढळ हाताने खर्च केला आहे.
Maharashtra TimesMonsoon Update: राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?

मोठी रक्कम खर्च करण्यात आली

ट्रस्टच्या उद्दिष्टानुसार खर्च केल्या जाणाऱ्या धार्मिक व सामाजिक कामावरही तब्बल २४ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त घसारा खर्च, मालमत्ताविषायक खर्च, खरेदी खाते, इतर युनिटचा खर्च यांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली असून, मुख्य व इतर खर्चापोटी आठ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च आर्थिक विवरणपत्रकात नमूद करण्यात आला आहे. मागील वर्षभरात ४८ कोटी ७१ लाख ३२ हजार रुपये एवढे एकूण महसुली उत्पन्न रोख स्वरूपात जमा आहे. तर ४२ कोटी ७९ लाख १७ हजार एवढा महसुली खर्च आहे आणि पाच कोटी ९२ लाख १४ हजार निव्वळ नफा मंदिर संस्थानकडे रोख स्वरूपात जमा आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा