Headlines

Dharashiv Mangrul 36 Year Old Youth Killed Body Dragged 200 Feet Suspect in Police Custody; अज्ञात कारणावरुन युवकाला मध्यरात्री संपवलं, पार्थिव २०० मीटर फरपटत नेलं; घटनास्थळी पोहोचताच पोलीसही चक्रावले


Dharashiv Crime News : धाराशिवमधील मंगरुळमध्ये एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचं पार्थिव देखील फरपटत नेल्याचं समोर आलं आहे.

Dharashiv Mangrul Youth Killed
धाराशिव मंगरुळ युवकाची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव : धाराशिव तालुक्यातील मंगरूळ परिसरात एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची मोठी घटना शुक्रवारी १० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हत्या करुन पार्थिव फरपटत नेलं

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आनंद साठे (वय ३६, रा. मंगरूळ) यांचं पार्थिव तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर मंगरूळपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील पुलाजवळ आढळून आला. सकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मध्यरात्री साठे यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या पाहणीत पार्थिव सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर फरपटत नेण्यात आल्याचं देखील निष्पन्न झालं असून, ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा संशय बळावला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, तपासासाठी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमकं कारण? इतर कोणाचा सहभाग आहे का? तसेच पार्थिव दूरवर का नेण्यात आलं? याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोसमुळे तरुणीचा मृत्यू

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन १८ वर्षीय तरुणी गरोदर असल्यामुळे तिने गर्भपात करण्याच्या गोळ्या घेतल्या. मात्र, गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे संबंधित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा