पुणे : कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी काढलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. आता या सगळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची पाठराखण केली आहे.
पुण्यात आज झालेल्या तिरंगा यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘सरकार हे संविधानाप्रमाणे चालते आणि यापुढे देखील सरकार संविधानानेच चालेल. सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य देखील चालत नाही. मात्र सरकार सगळ्यांचं ऐकून घेतं. सगळ्यांचं ऐकून घेणं ही सरकारची जबाबदारी असते. कोणी चांगल्या शब्दात मांडतो कोणी वेगळ्या शब्दात मांडतं. कोणी कोणत्याही शब्दात म्हणणं मांडलं तरी ते जनहिताचं असलं किंवा संविधानात बसत असलं तरच ते ऐकलं जाईल. संविधानात बसलं नाही तर ऐकलं जाणार नाही,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.
“हे काही पहिल्यांदा नाहीये, हे सुरूच आहे. आमचं लक्ष समाजाकडे आहे. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने जे केलं ते इतर कोणत्याही सरकारने केलं नाही. मराठा समाज असो किंवा ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी असो, संविधानाने सर्वांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. सरकार सगळ्यांची काळजी घेईल. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला दिलं जाणार नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या टीकेवर आपली भूमिका जाहीर केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बावनकुळे यांची पाठराखण केली आहे. कुठल्याही मंत्र्याकडे कोणाचीही तक्रार आली तर त्या मंत्र्यांने त्याची चौकशी करायला लावणे, ही संविधानिक जबाबदारी आहे. अशाच प्रकारे एक आलेलं निवेदन ते विभागाकडे गेलेलं आहे. त्या निवेदनामुळे विभाग कोणताही निर्णय करत नाही. विभाग हा पुराव्याच्या आधारे निर्णय करत असतो. त्याची कमिटी ही सरकारला बांधील नाही. कमिटीला संपूर्णतः न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणारं नाही. माझं स्पष्ट मत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक याचं रद्द करा, याला द्या, असं अजिबात केलेलं नाही. मंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य होतं ते त्यांनी केलेलं आहे. या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत बावनकुळे यांची उघड पाठराखण केली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा